शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १२१ पैकी ११८ कापूस खरेदी केंद्रे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:11 IST

सीसीआयचा दावा: ग्राहक पंचायतने केला दिरंगाईचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याचा सुरुवातीला निर्णय घेण्यात आला होता. यातील ११८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे सुरू करताना कापसाचा बाजारभाव व आवक विचारात घेण्यात आली. बहुतांश केंद्र १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आल्याचा दावा सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, सीसीआय कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यास दिरंगाई करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र ग्राहक पंचायतचे संघटक श्रीराम सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर केले आहे.

एमएसपी दराने कापसाची खरेदी करण्यासंदर्भात श्रीराम सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यात यावर्षी १२१ कापूस खरेदी केंद्र १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू केल्याचे सीसीआयने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. वास्तवात, सीसीआयने नागपूर जिल्ह्यात १३ डिसेंबर २०२४ रोजी, बुलढाणा जिल्ह्यात २५ ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान, अमरावती जिल्ह्यात नोव्हेंबर २०२४, अकोला जिल्ह्यात ११ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान, वाशिम जिल्ह्यात ११ व १४ नोव्हेंबर २०२४ रोजी, यवतमाळ जिल्ह्यात ८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तर चंद्रपूर १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. त्यामुळे सीसीआयने खेटे व बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचे तसेच सीसीआयवर कायदेशीर कारवाई करावी, असे श्रीराम सातपुते यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कापूस खरेदी नाही भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २ जानेवारी २०२४ पर्यंत एकही कापूस खरेदी केंद्र सीसीआयने सुरू केले नाही, असे श्रीराम सातपुते यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मुळात हे दोन्ही धान उत्पादक जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जिनिंग प्रेसिंग नाहीत. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात तीन हेक्टर तर भंडाऱ्यात ६७८ हेक्टरमध्ये कापसाची पेरणी करण्यात आली होती. भंडाऱ्यातील कापूस पेरणी क्षेत्र हे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यालगतचे आहे. या जिल्ह्यांमध्ये जिनिंग नसल्याने सीसीआयला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास अडचणी येत असून, ते आर्थिकदृष्ट्या तोट्याचे ठरते. 

बाजारभाव व आवक यावर्षी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे कापूस वेचणी व बाजारात यायला विलंब झाला. सुरुवातीला कापसाचे दर दर एमएसपीला समांतर होते. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे तसेच सीसीआयकडे नोंदणी करणे टाळले. त्यामुळे बाजारातील कापसाची आवक संथ होती. नोंदणी शिवाय सीसीआय शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करीत नाही. ज्याठिकाणी कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करण्यावर भर दिला. परंतु, आवक नसल्याने अडचणी निर्माण झाल्या.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीnagpurनागपूर