१0५ प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे वेतन थांबविले

By Admin | Updated: May 25, 2014 00:44 IST2014-05-25T00:44:53+5:302014-05-25T00:44:53+5:30

जिल्ह्यातील ४१६ अनुदानित प्राथमिक शाळांपैकी केवळ २९१ शाळेतील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन आठ दिवसात युनियन बँकेत जमा होणार आहे. मात्र १0५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी

105 teachers of primary school teachers stop the salary | १0५ प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे वेतन थांबविले

१0५ प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे वेतन थांबविले

मुख्याध्यापकांवर होणार कारवाई : २९१ प्रा. शाळेचे वेतन युनियन बँकेतून

नागपूर : जिल्ह्यातील ४१६ अनुदानित प्राथमिक शाळांपैकी केवळ २९१ शाळेतील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन आठ दिवसात युनियन बँकेत जमा होणार आहे. मात्र १0५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी अद्यापही शालार्थ प्रणालीद्वारे वेतन बिल वेतनपथकास सादर केले नाही. त्यामुळे १0५ शाळांतील शिक्षकांचे वेतन थांबविले आहे. या शाळांतील मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकार्‍यांनी दिला आहे.

खाजगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांच्या उपस्थितीत प्राथमिक शिक्षणाधिकारी ललित रामटेके यांच्याशी रविभवन येथे शिक्षकांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी शिक्षकांचे पगार युनियन बँकेतून करण्यास दुजोरा दिला. मात्र शालार्थ प्रणाली अंतर्गत वेतन बिल वेतन पथकास सादर केले नाही, अशा शाळांच्या शिक्षकांचे वेतन थाबंविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समायोजित शाळेत केले नाही, अशा शाळांचे पगार थांबविण्यात आले आहे. २ मे च्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन शिक्षक भरती करू नये, असे असतानाही काही शाळांना नियमबाह्य नियुक्त्या व मान्यता देण्यात आल्या आहे. यात तत्कालीन शिक्षण अधिकारी सोमेश्‍वर मेश्राम यांचा समावेश असावा असा आक्षेप ना. गो. गाणार यांनी घेतला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी गाणार यांनी केली. यावेळी प्रमोद रेवतकर, सुनील चिचघरे, विजय नंदनवार, हेमंत बेलखोडे, सतीश कसरे, लोकपाल चापले, अतुल टेकाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 105 teachers of primary school teachers stop the salary