Marathi Jokes: भविष्यात कशी असतील नवरा-बायकोमधील भांडणं?; वाचा आणि मनमुराद हसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 08:00 IST2020-10-07T07:59:58+5:302020-10-07T08:00:07+5:30

सोशल मीडियावर लग्न जुळलेल्या मंडळींची भांडणं कशी असतील?

husband wife dispute jokes in marathi | Marathi Jokes: भविष्यात कशी असतील नवरा-बायकोमधील भांडणं?; वाचा आणि मनमुराद हसा

Marathi Jokes: भविष्यात कशी असतील नवरा-बायकोमधील भांडणं?; वाचा आणि मनमुराद हसा

आम्ही सोशल मीडियावर भेटलो.. तिथे मैत्री झाली.. त्याचं रुपांतर प्रेमात झालं.. मग त्यानंतर आम्ही लग्न केलं.. अशा लव्ह स्टोरी सध्या खूप जणांकडून ऐकायला मिळताहेत..
 

सोशल मीडियामुळे लगीनगाठ बांधलेल्यांची भविष्यातली भांडणं कशी असतील? 
 

पत्नी- न जाणे कोणत्या मुहूर्तावर तुमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली होती मी...
 

पती- मीच मूर्ख होतो ग.. तुझ्या डीपी खाली नाईस पिक डिअर अशी कमेंट केली..
 

पत्नी- हो ना.. मी पण बावळट.. तुमच्या फोटो खाली हँडसम लूक कमेंट करून बसले..
 

पती- तिथंच थांबायला हवं होतं मी.. तरीही गेलो मेसेंजरवर कडमडायला, जेवलीस का विचारत..
 

पत्नी- मलाही अक्कल नव्हती.. इतक्या फालतू प्रश्नाला उत्तर दिलं ना मी...
 

पती- त्याच वेळी तुला अनफ्रेंड केलं असतं ना, तर आज हा दिवस पाहावा लागला नसता..
 

पत्नी- तेच ना तेच.. तुम्हाला तेव्हाच ब्लॉक केलं असतं ना, तर वाचले असते मी.. त्या सोशल मीडियामुळे तुमच्यासारख्या माणसाला आयुष्यभर सोसावं लागेल, याची कल्पना नव्हती ना मला...
 

Web Title: husband wife dispute jokes in marathi