शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सरबत

By admin | Updated: April 25, 2015 14:32 IST

नाताळ जवळचा वाटतो, कारण लहानपण ख्रिश्चनांमध्ये गेलेलं. खडकमाळआळीच्या परिसरात दोन चर्च आहेत. त्याच परिसरात पंचहौद मिशनच्या इंग्रजी नाव असलेल्या शाळेत मराठीत शिकलो.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
नाताळ जवळचा वाटतो, कारण लहानपण ख्रिश्चनांमध्ये गेलेलं. खडकमाळआळीच्या परिसरात दोन चर्च आहेत. त्याच परिसरात पंचहौद मिशनच्या इंग्रजी नाव असलेल्या शाळेत मराठीत शिकलो. शाळेचं नाव भलं मोठं होतं. सेंट एडवर्ड बॉईज प्रायमरी स्कूल. मिशनची शाळा, त्यामुळे अर्थातच शिक्षक, विद्यार्थी, शिपाई, अशी बहुतेक जनता ािस्ती. ािश्चनबहुल वस्ती. मला आठवतंय, राहुरकर नावाचं एक ब्राrाण कुटुंब मात्र तिथं राहत होतं. त्यांचं मोठं घरही होतं तिथे. आजही आहे. परिसरातल्या घरोघरचे धार्मिक कार्यक्र म गुरुजींनी पूजा सांगितल्याशिवाय होत नसत.
शाळेला अगदी चिकटूनच एक देऊळ. देवळाच्या बरोब्बर डायगोनली ऑपोङिाट पवित्र नाम देवालय चर्च. मोठा उंच टॉवर हे वैशिष्टय़. विटाविटांचं, अतिशय देखणं ब्राउनब्राउन बांधकाम.
नाताळच्या निमित्तानं आज खूप दिवसांनी गेलो तर शाळा, देऊळ, चर्च, मधला रस्ता हे सगळं खूप जवळ जवळ वाटलं. लहानपणी ही अंतरं जास्त वाटत. तेव्हा रस्ताही बराच मोठा, रूंद वाटायचा.
हे नेहमीच असं होतं. कदाचित लहानपणी आपण लहान असतो, म्हणून असेल! परस्पेक्टिव्ह बदलत असणार!
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे सबंध परिसरात पसरलेला बेकरीचा वास!
वासाबरोबर तरंगत तरंगत गेलो भूतकाळात.
आठवला : किरण्या. 
किरण सातारकर. जीवश्चकंठश्च मित्र. वर्गात एका बेंचवर तर असायचोच, एरवीही सदोदित एकत्र. ख्रिश्चन शाळेत प्रार्थनेला प्रार्थना म्हणतात, किंवा प्रेअर.
शाळा सुरू होताना, संपताना येशूची प्रेअर रोज म्हणावी लागायची. 
मी आणि किरण्या येशूचंच काय इतरही कोणतंच स्तोत्र वगैरे काही म्हणत नसू. त्यामुळे प्रेअरच्या वेळी मी आणि किरण्या खाली मान घालून काही न म्हणता नुसतेच उभे असायचो.
रविवारी सकाळी खेळायला जायच्या आधी आम्ही सगळे चर्चमध्येच आधी भेटायचो. शाळेतल्या बाई, मुख्याध्यापक वगैरे सगळे रविवारी चर्चला (प्रेअरला!) येतच. आमची एकमेकांना भेटायची वेळ थोडी इकडेतिकडे झाली, की बाईंबरोबर मग आत, चर्चमध्ये नाइलाजास्तव जावंच लागायचं. मग एकेक जण जमले की बाईंचा आणि फादरचा डोळा चुकवून ग्राउंडकडे पसार व्हायचं!
किरण्याबरोबर मी जे खाल्लंप्यायलं, त्यापैकी महत्त्वाचं पेय- लिंबू सरबत आणि महत्त्वाचा खाद्यपदार्थ- खोबरं !
 
शाळेत जाण्यायेण्याच्या रस्त्यावरच चौकात चर्च. चर्चच्या समोरच्या डाव्या कोप:यातला खांब ही एक विशेष जागा होती.
आता वार आठवत नाही, पण आठवडय़ातल्या कुठल्यातरी एका ठरलेल्या दिवशी आणि अमावस्येला त्या खांबाखाली नैवेद्य पडलेला दिसायचा.
किरण्याला आणि मला सवयच लागली होती. अमावस्या आणि आठवडय़ातल्या  त्या  दिवशीच्या दुस:या दिवशी जरा लवकरचीच बरोब्बर वेळ गाठून एका रोडवरनं किरण्या आणि विरुद्ध रस्त्यावरनं मी असे आम्ही समोरासमोर चौकात यायचो.
खांबाखाली नैवेद्य असायचाच.
रात्री बाराला नैवेद्य देताना पाणी ओतलेलं असणार म्हणून तिथल्या तीनचार स्क्वेअर फूट जमिनीचा भाग इतर जमिनीपेक्षा किंचित ओलसर आणि थोडा डार्क. अर्धवट ओलसर, किंचित गार. हळदकुंकवानं माखलेली दोन किंवा कधीकधी पाच लिंबं. फोडून उपडी पडलेली नारळाची भकलं. मिरच्या.
किंचित सुकलेला एखादा हार. हारातनं विखरून पडलेली फुलं. सहा इंच बाय सहा इंचाचा एक मांडव. बांबूच्या सहाएक इंचाच्या पट्टय़ा बोट-बोट अंतर सोडून एकमेकांना जोडून जणू एक पिंजरा केलेला. त्याला लाल, गुलाबी, पिवळ्या कागदाच्या पट्ट्य़ा पाच बाजूंनी चिकटवलेल्या, एक बाजू उघडी. तंत्रमंत्रच्या जगात ह्याला मांडव म्हणतात.
खांबाखाली हा सगळा नैवेद्य. आम्ही जवळ जवळ जात जात त्या ओलसर भागाचं एक जे अंधूक, अस्पष्ट असं एक वर्तुळ झालेलं असायचं, त्यात हातातल्या दप्तरासहीत पाय टाकायचो, आत प्रवेश करायचो.
कशी काय लागायची आणि हुकमी व्हायचीसुद्धा कुणास ठाऊक; पण, मध्यभागी गेल्यावर चड्डी वर करून आपल्या स्वत:च्याच भोवती सर्वात आधी लघवीचं एक मोठय़ातलं मोठं रिंगण करायचं. एकाच्यानं पूर्ण नाही झालं तर दुस:यानं शेवटचा थेंब कामी येईपर्यंत रिंगण पूर्ण करायचं. तसं ब:यापैकी मोठं वर्तुळ व्हायचं.
हा झाला संरक्षित एरिया. किरण्याचं लॉजिक असं, की आपल्या ह्या वर्तुळाच्या आत कोणत्याच भुताची पॉवर चालत नाही. आणि त्यामुळे आपण त्या वर्तुळाच्या आत काही केलं तरी ते भूत आपल्याला काही करू शकत नाही. 
रस्त्यावर गर्दी फारशी नसायचीच, तरीही कुणाच्या फार लक्षात यायच्या आत पटकन पाच जोर मारायचे.  (मोजून पाचच बरं का! कमी नाही की जास्त नाही!)
लिंबं, नारळाची भकलं दप्तरात घालायची, तडक शाळेचा रस्ता पकडायचा.
मधल्या सुटीत खोब:याचे जमतील तेवढे तुकडे करून वाटून टाकायचे आणि वर साखरमीठ पैदा करून साताठजणांना सरबत! 
 
कशी भीती वाटणार भुताखेताची, जारणमारण नि तंत्रमंत्रची?!
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)