शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

रिस्टार्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 6:03 AM

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या आगेमागे जुनं पुसून  नव्याने आयुष्य  आखायला घेतलेल्या ‘न्यू-नॉर्मल’ लोकांचा शोध

रिस्टार्ट..

खूप प्रयत्नाने  जमवलेली संसाराची घडी कोरोनानेपार विस्कटून टाकल्यावर भिरभिरलेल्या तुमच्या घरातखोलवर काही बदलले आहे का?आपत्तीने कोलमडणार्‍या, प्रदूषणाने गुदमरलेल्याशहरातून शक्य तर बाहेर पडावे, थोडे शांत जगावे,असे तुम्हाला वाटू लागले आहे का?

शहरातली धावाधाव, जड झालेले ईएमआयचे ओझे, गळ्याला सतत फास लावून असलेल्या डेडलाइन्स, कधीच पूर्ण न होणारी टार्गेट्स, कितीही मिळाला तरी न पुरणारा पैसा, कितीही ठरवले, तरी कधीच न मिळणारा वेळ,. हे सगळे नकोसे होऊन तुम्ही आयुष्याची गाडी फास्ट लेनमधून काढून साध्या-सोप्या-आनंदी रस्त्यावरून नेऊ पाहाता आहात का?

महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तुम्ही किंवा तुमचा एखादा मित्र-मैत्रीण, नातेवाईक, सहकारी.. यापैकी कुणी या नव्या मार्गावरून निघाले असेल, तर त्यांच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. शोधलेले मार्ग, आलेल्या अडचणी, न सुटलेले प्रश्न हे सगळे हवे आहे.

या सगळ्या कहाण्या एकत्र करून आम्ही विणतो आहोत एक गोधडी..यावर्षीची दिवाळी अधिक ऊबदार व्हावी म्हणून आणि अस्वस्थ अंधारात चाचपडत असलेल्यांपुढे एक नवा पर्याय ठेवावा म्हणूनही!!!

तुमची कहाणी आमच्यापर्यंत पोहोचली, की आमचे संपादकीय सहकारी तुमच्याशी संपर्क साधतील..मग आपण अधिक तपशिलात बोलूया!!! आणि तुमच्या ‘रिस्टार्ट’ची गोष्ट सगळ्या जगापुढे मांडूया.

कुठे पाठवाल?1. संगणकावर लिहिणार असाल तर युनिकोडमध्ये लिहून ओपन वर्ड फाइल पाठवा. हाताने लिहिणार असाल तर हस्तलिखित स्कॅन करा आणि आम्हाला ई-मेल करा किंवा व्हॉट्सअँपवर शेअर करा.2. व्हॉइस क्लिप रेकॉर्ड करून थेट व्हॉट्सअँपवरही पाठवू शकता.3. तुमचे पूर्ण नाव आणि संपर्काचा तपशील न विसरता द्या.ई-मेल पत्ता : restart@lokmat.com

व्हॉट्सअँप नंबर : 9112050500अंतिम मुदत : 30 सप्टेंबर 2020