शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे !

By अतुल कुलकर्णी | Updated: November 9, 2025 13:38 IST

आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते"

-अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
मिस्टर अब्राहम लिंकन नमस्कार.
कधीकाळी तुम्ही तुमच्या पोरासाठी गुरुजील पत्र लिहिले होते. "सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र, त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही..." असा अनुवाद आमच्या वसंत बापट यांनी मराठीत केला होता.  

मिस्टर लिंकन, आता काळ बदलला. तुमच्या पत्राचा आम्हाला काही उपयोग नाही. आता न्यायप्रिय, सत्यनिष्ठ, साधुचरित, पुरुषोत्तम, समर्पित आयुष्य... हे शब्द बिनकामाचे आहेत. आता आम्हाला फार वेगाने पुढे जायचे आहे. राज्याची इकॉनोमी तीन ट्रिलियन डॉलर करायची आहे. त्यासाठी आम्हाला दिसेल ती जमीन मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावी लागणार आहे. कधी प्रेमाने, कधी बळाने, कधी गांधीजींचे फोटो देऊन... "जेवढ्या जमिनी जास्त तेवढा वेगवान विकास" हे आम्हाला कायम लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते" असे म्हणत त्याच्या कर्तृत्वाला दाद देतो. मीडियावाले फार आगाऊ आहेत. निष्कारण साप म्हणून भुई थोपटण्याचे काम करतात. अशा विषयांची फार बोंबाबोंब झाली, तर जमीन खरेदीचा व्यवहारच रद्द केला आहे, असे सांगणारे नेते आमच्याकडे आहेत. म्हणूनच म्हणतो मिस्टर लिंकन, अशी फिरवाफिरवी आजच्या पिढीला शिकविण्याची गरज असताना तुम्ही कसले धडे शिकवण्याचा आग्रह धरला होता? 

मिस्टर लिंकन, तुमच्या पत्रात तुम्ही, "मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे," असे लिहिले होते, पण नेत्यांची पोरं एसी घरात राहतात. एसी गाड्यात फिरतात. मग त्यांना घाम कसा येणार? घाम आला नाही तर त्यांनी कमवायचे
कसे..? त्यामुळे तुमचा हा मुद्दाही आता गैरलागू आहे. त्यापेक्षा नेत्यांची पोरं कोणते कायदे, कसे वाकवायचे याचा अचूक अभ्यास करून कोट्यवधी रुपयांचा कर वाचवतात...

त्यासाठी तुम्ही त्यांना शिकवणाऱ्या बापाचे कौतुक करायला हवे!

English
हिंदी सारांश
Web Title : Our spoiled brats are thugs; their flags fly everywhere!

Web Summary : The author laments the erosion of values, contrasting Lincoln's ideals with today's reality where leaders' children amass wealth through dubious means, bending rules, and evading taxes, aided by their influential fathers.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPoliticsराजकारण