शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

डावे- उजवे

By admin | Updated: February 6, 2016 15:16 IST

मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले. तो म्हणाला, ‘डावरे म्हणजेच डावे. तू जन्मत:च डावा आहेस.’झाले. माझी खात्रीच पटली.

 
सचिन कुंडलकर
 
मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले. तो म्हणाला, ‘डावरे म्हणजेच डावे. तू जन्मत:च डावा आहेस.’झाले. माझी खात्रीच पटली.  पण तो पुढे म्हणाला,
‘तू डावा होण्यापेक्षा समाजवादी हो.’ म्हणजे काय? तर तो म्हणाला,  ‘ते मला माहीत नाही. पण माझी एक आत्या समाजवादी आहे. आणि शिवाय ती फेमिनिस्ट पण आहे. ती खूप मजेत असते. देवधर्म करत नाही. पुस्तके वाचते. तिचा नवरा दाढी करतो. शिवाय ते वेल टू डू आहेत.  मस्त युरोपला जातात 
आणि ते आनंदी पण असतात. तू समाजवादीच हो.’
 
मी डावरा आहे, डाव्या हाताने लिहितो हे समजल्यावर माङया एका ओळखीच्या गृहस्थांनी मला आपुलकीने ‘येत्या रविवारी संध्याकाळी अमुक अमुक ठिकाणी एक सभा आहे, तिथे ये’ असे सुचवले. 
‘डाव:या लोकांची संघटना पुण्यात आहे. आम्ही सगळे महिन्यातून दोनदा तिथे भेटतो.’
मी बरं म्हणालो. 
ते डाव्या विचारसरणीचे म्हणून जे लोक असतात असे आपण वाचतो ते तर आपण नाही? मला बरेच वेळा काही कळत नसे. आपण डावरे आहोत म्हणजे डावे आहोत की काय? मला स्वत:ची भीतीच वाटायची त्या कोवळ्या वयात. म्हणजे आपल्याला आता सभा, मोर्चे काढायला लागणार आणि जे घडेल त्याला विरोध करत बसावा लागणार बहुतेक. आणि आनंदी होताच येणार नाही. कारण केव्हढे ते सामाजिक प्रश्न पुण्यात! आणि ते असताना आपण आनंदी राहायचे? हे डाव्या लोकांना पटत नाही असे मी ऐकून होतो. 
पुण्यातले डावे लोक सगळ्याला विरोध करतात असेही मी ऐकून होतो. हे लोक सभेला बोलावतायत म्हणजे काहीतरी गंभीर गुप्त संघटना असणार. आपल्याला त्यात सामील करून घेतायत बहुधा. 
माझा सगळा आठवडा अतिशय गोंधळात आणि भीतीमध्ये गेला. आपल्याला काय काय करायला लावतील, कोणती पुस्तके वाचायला लावतील, रशियात वगैरे जायला लावतील बहुधा काहीतरी गुप्त कागदपत्रे घेऊन. कारण डाव्या लोकांना रशियाचे फार प्रेम असते असे मला कळले होते. आमच्यासारख्यांच्या घरात इंग्लंड- अमेरिकेला जाण्याने जे पुण्य मिळते ते डाव्या लोकांना लेनिनग्राड, स्तालीनगराड, मोस्को ह्या क्षेत्री जाऊन मिळते असेही काही पुस्तके वाचून तोपर्यंत कळले होते. 
त्या आठवडय़ात मी प्रयत्न करून उजव्या हाताने जेवून बघ, उजव्या हाताने लिहून पहा असे सगळे प्राणायाम करून पाहिले. पण कसचे काय? उजवा हात मेला अगदी नेभळट निघाला. उजव्या हाताने कसे जाज्वल्य, कणखर आणि देशप्रेमी असायला हवे. शिवाय ब्रrाचर्याचे तेज उजव्या हातावर नुसते सळसळायला हवे. तसे काहीच त्या माङया उजव्या हाताचे होत नव्हते. माझा डावा हात सगळी आवश्यक कामे करी आणि उजवा हात सगळी नको ती कामे करी. त्या दोघांसोबत माङो खरे म्हणजे बरे चालले होते. आता ह्या संघटनेत जाऊन ‘एकच हात आपला’ असे निवडायला लागणार बहुधा. मी जीव मुठीत धरून रविवारची वाट पाहायला लागलो.
लाल रंग पाहिला की त्या आठवडय़ात माङया अंगावर शहारे येत. देवासमोरचे कुंकू, फोडणीच्या डब्यातले तिखट. बाप रे बाप. आणि दाढी वाढवायला लागेल की काय? मला खरे तर तेव्हा नुकती कोवळी कोवळी दाढी येऊ लागली होती आणि मला टीव्हीवरच्या जाहिरातीत दाखवतात तशी गालाला भरपूर फेस लावून दाढी करायची होती. सुगंधी आफ्टरशेव लावायचे होते. मला स्वच्छता आणि टापटीप ह्याची भारी आवड. दाढी वाढवायला लावली तर मात्र आपण डावे व्हायला सरळ नकार देऊ हे मी स्वत:ला बजावत राहिलो.
एकप्रकारे मी सुप्तपणो उत्साहात होतोच कारण एकदा का डावे बनलो की आपल्या आजूबाजूचा देवधर्म, देवळात जा, आरत्या म्हणा, श्लोक पाठ करा, जानवे घाला हे सगळे अत्याचार टळतील. मला ते सगळे धार्मिक वातावरण काही म्हणजे काही केल्या आवडत नसे. डाव्यांना देव चालत नाही ही एक उजवी बाजू त्यांच्यात मला दिसली. 
मला खरे म्हणजे आजूबाजूच्या सदाशिवपेठी वातावरणातून पळूनच जायचे होते. सगळे बदलूनच टाकायचे होते. एखादा म्युङिाक बॅण्ड काढावा आणि गिटार वाजवत जगभर फिरावे हे माङो स्वप्न होतेच. पण जे काही करू ते मस्त आनंदात आणि भरपूर पैसे कमावून. उगाच उपाशी राहून मोर्चे काढत विरोध बिरोध करण्याचा आणि बॉम्बफेक करण्याचा माझा पिंडच नव्हता. 
बघू रविवारी काय वाढून ठेवलंय आपल्या पुढय़ात! मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रपाशी मन मोकळे केले.
तो म्हणाला, ‘डावरे म्हणजेच डावे. तू जन्मत:च डावा आहेस.’
झाले. माझी खात्रीच पटली. पण तो पुढे म्हणाला, ‘तू डावा होण्यापेक्षा समाजवादी हो.’
म्हणजे काय? 
तर तो म्हणाला, ‘ते मला माहीत नाही. पण माझी एक आत्या समाजवादी आहे. आणि शिवाय ती फेमिनिस्ट पण आहे. ती खूप मजेत असते. तिच्या वाटय़ाला कुणी जात नाही. ती देवधर्म करत नाही. पुस्तके वाचते. तिचा नवरा दाढी करतो. शिवाय ते वेल टू डू आहेत. ते मस्त युरोपला जातात आणि ते आनंदी पण असतात. तू समाजवादीच हो.’
मी म्हणालो, ‘रविवारनंतर ठरवू.’
रविवारी मी चेह:यावर शक्य तितका आत्मविश्वास ठेवून त्या सभागृहात प्रवेश केला. तिथे मला सगळे आमच्या आजूबाजूला राहतात तसेच घारेगोरे लोक दिसले. 
म्हटले, बरेच लोक स्वत:मध्ये बदल घडवायला आलेत वाटते इथे. 
शिवाय चहा, वेफर्स आणि साबूदाणा खिचडी होती. मग मला ओळखत होते ते गृहस्थ तिथे आले आणि ते आम्हाला जगभरात कोण कोण डावरे आहेत ह्याची माहिती द्यायला लागले. खूपच मोठमोठी नावे होती. लेखक, शास्त्रज्ञ, क्रिकेटपटू, राजकीय नेते, कवी. मला अगदी स्फुरण चढले. म्हणजे आपण ह्यांच्यापैकी एक आहोत तर.
मग त्यांनी डावरे असण्यामागची शास्त्रशुद्ध कारणो समजावली. 
मेंदूचे दोन भाग. उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण ठेवतो. तो प्रबळ असला की डाव्या हाताने लिहिले जाते. बहुतांशी लोकांचा डावा भाग प्रबळ असतो त्यामुळे ते सगळी कामे उजव्या हाताने करतात. आपण वेगळे आहोत.
ही संघटना आंतरराष्ट्रीय होती तरी राजकारणाचा काही विषयच येईना. शिवाय अतिशय शांतपणो सगळे चालले होते. मग काही जण उठून बोलू लागले.. त्यांना त्यांच्या घरात डावरे असण्याबद्दल कसे वागवले जात होते, मुद्दाम शिक्षा करून उजव्या हाताने लिही, जेव असे सांगितले जात होते. अनेक वेगवेगळी यंत्रे जी फक्त उजव्या हाताने काम करणा:या माणसांचा विचार करून बनवली जातात त्यामुळे आपला कामाचा वेग कसा कमी होतो..
मला ते सगळे ऐकून फार बरे वाटले. माङया घरी मी डावरा होतो ह्याचा कधीच कुणी बाऊ केलेला नाही, मला जसे हवे तसे घरचे सगळे करू देतात असे माझी पाळी आल्यावर मी म्हणालो. मग सगळ्यांचे नाव, पत्ते अशा नोंदी करून घेतल्या. पुढच्या सभेची तारीख ठरली आणि मग एकमेकांशी गप्पा मारा असे आम्हाला सांगितले. सभा जवळजवळ संपली. 
राजकारणाचे, कार्ल मार्क्‍स, रशियाचे नावच नाही. अरे बापरे! असे असते का डावे किंवा डावरे असणो? मग चांगले आहे की!
मला आमच्या पुण्यातले डावे लोक फारच आवडले. डावे असणो म्हणजे एरवी जे जगात सरधोपटपणो चालू आहे त्याला पर्यायी विचार करणो असे असावे बहुधा. किंवा इतरांपेक्षा काही वेगळी माणसे असतात त्यांना समजून घेणो म्हणजे डावे असणो असे असावे बहुधा. जरा वेगळ्या नजरेने चालू असलेल्या गोष्टींकडे बघायची सवय लावून घेणो. 
म्हणजे ठोस कुंपणो नाहीयेत आणि थोडेसे इथून तिथे तिथून इथे उडय़ा मारत मजेत जगायची सोय असू शकते तर! 
मी जवळजवळ तरंगतच झुलता पूल ओलांडून आमच्या घरी येऊन दाखल झालो आणि ‘उद्यापासून मी देवळात आलो नाही तर चालेल का?’ असे आईला विचारले. ती शांतपणो ‘हो’ म्हणाली. ‘जानवे घातले नाही तर चालेल का?’ असे विचारले. ते सारखे शर्टातून दिसते. बाबा त्यालाही ‘हो’ म्हणाले.
..आणि मी डाव्या हाताने मस्त वरणभात तूप असे जेवलो. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com