शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

साने गुरुजी कथामाला चळवळीला समर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 08:10 IST

आत्मप्रेरणेचे झरे : साने गुरुजी कथामाला हा मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगणारा उपक्रम आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर हा उपक्रम  समर्थपणे पुढे नेणाऱ्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील शिक्षिका कल्पना हेलसकर यांची या महिन्यातील साने गुरुजी जन्मदिनानिमित्त मुलाखत.

- हेरंब कुलकर्णी 

प्रश्न - तुमचे दिवंगत पती दत्तात्रय हेलसकर यांनी मराठवाड्यात साने गुरुजी कथामालेचे झपाटल्यासारखे काम केले. त्या कामाविषयी थोडे सांगा?  -    यदुनाथ थत्तेच्या प्रेरणेने त्यांनी साने गुरुजी कथामालेचे काम १९९३ पासून सुरूकेले. अतिशय गरीब परिस्थितीतून पुढे ते आले. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात हे काम पोहोचवले. २००१ साली आमचे लग्न झाले; पण आमच्या  दोघांपैकी एकाचा पगार या कामासाठी त्यांनी खर्च केला. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा घेणे, शिक्षकांना साने गुरुजी पुरस्कार देणे, कथामालेची शाखा सुरू करणे असे उपक्रम ते सतत करीत. साने गुरुजी कथामालेच्या वतीने श्यामची आई पुस्तकावर परीक्षा घेतली जाते. आतापर्यंत १२००० पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. मुलांसाठी बाल चित्रपट महोत्सव त्यांनी आयोजित केला. २०१५ साली या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला जातानाच त्यांचे अपघाती निधन झाले. 

 प्रश्न - पतीच्या दुर्दैवी निधनानंतर तुम्ही हे काम कसे पुढे नेले ?  -    त्यांच्या मृत्यूने मी कोलमडून गेले होते; पण माझे वडील मला म्हणाले की, आता रडू नको त्यांचे काम तू पुढे नेले पाहिजे. मग मी मनाची उभारी धरली व साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष सुहास सदाव्रते व इतर कार्यकर्त्यांसोबत काम सुरूकेले. मी ७ ते ८ साने गुरुजी कथामालेच्या शाखा सुरु केल्या. साने गुरुजी पुरस्कार संपूर्ण मराठवाड्यात दिला जातो. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांनी ज्या ज्या शाळेत नोकरी केली तिथे ५०० वह्या वाटप केल्या. शिक्षकांनी मुलांना गोष्टी सांगाव्यात यासाठी शिक्षकात कथाकथन कौशल्य येणे गरजेचे आहे म्हणून शिक्षकांच्या कथाकथन स्पर्धा कथामालेने मराठवाडा विभागात सुरूकेल्या. त्यात शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यातून प्रत्यक्ष शाळेत शिक्षकांचे मुलांना गोष्टी सांगण्याचे प्रमाण वाढते आहे. दत्तात्रय हेलसकर त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी साने गुरुजी जन्मदिवशी जालना जिल्ह्यात बालमहोत्सव सुरु केला. त्यात मुलांसाठी विविध उपक्रम असतात. मुलांसाठी संस्कार शिबिरे आयोजित केली जातात. अशाप्रकारे दत्तात्रय हेलसकर यांचे कार्य आम्ही पुढे नेतो आहोत. 

प्रश्न - तुम्ही एक उपक्रमशील शिक्षिका आहात. तुमच्या शाळेवर तुम्ही कोणते उपक्रम राबविता?  -    माझ्या शाळेचे गाव हे गरीब कष्टकरी वर्गाचे गाव आहे. साने गुरुजींची वंचित मुलांविषयीची तळमळ लक्षात घेऊन मी ३८ शाळाबाह्य मुलींना शाळेत आणले आहे. या मुलींच्या घरच्या समस्या लक्षात आल्या. त्यात मी शिक्षिका म्हणून लक्ष घातले. मीना राजू मंच या उपक्रमात मी विद्यार्थ्यांना या शाळाबाह्य मुलांच्या घरी घेऊन गेले. त्यातून या मुली शाळेत येऊ लागल्या. या उपक्रमासोबत मी शाळेत बाल वाचनालय सुरूकेले आहे. मधल्या सुटीत मुले खिचडी खाल्ली की ही पुस्तके वाचतात व पुस्तकात नेमके काय आवडले? याविषयी मुलांना बोलायला सांगते. मुले शेवटच्या तासिकेला किंवा परिपाठात वाचलेल्या पुस्तकाविषयी माहिती सांगतात. शाळेतील मुले शिव्या देत. हे प्रमाण खूपच होते. त्यासाठी ‘शिवीबंद अभियान’ सुरूकेले. मुलांना शिव्या देण्यामागची विकृती समजून सांगितली. तरीही कुणी शिवी दिली तर त्याला फुल देऊन आम्ही गांधीगिरी करतो. त्यातून शिव्या बंद झाल्या. वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी शाळेत पुस्तक जत्रा भरवली. मुलांना २०० पुस्तके आणून दिली व मुलांनी ती पुस्तके खरेदी केली. त्यातून पुस्तक खरेदीचा संस्कार मुलांवर झाला. पालक संपर्क महत्त्वाचा मानून शनिवारी एका गटाच्या पालकांना एकत्र आणतो आणि त्यांच्या मुलांच्या विकासासाठी चर्चा केली जाते.     ( herambkulkarni1971@gmail.com ) 

टॅग्स :SocialसामाजिकEducationशिक्षणTeacherशिक्षक