शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

‘बटन मसाला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 06:00 IST

डिझाइन हे अनेक प्रश्नांवरचं उत्तर आहे.  फॅशन हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. फॅशनवर होणारा खर्च, त्यामागची मेहनत,  कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय  अशा अनेक प्रश्नांवर अनुज शर्मा यांनी उत्तर शोधलं. एक सलग आयताकृती कपडा,  बटन म्हणून गोट्या, शिंपले, बिल्ले, खडे. असे जे काही उपलब्ध असेल ते आणि रबरबॅण्ड!  फक्त एवढय़ाच सामग्रीतून पेहेरावाचे अनंत प्रकार!  कुठेही कापलं नाही की शिवलं नाही. त्यामुळे कापडाचा एकही तुकडा वाया गेला नाही.  मशीनचा वापर नाही, त्यामुळे ऊर्जाही खर्च झाली नाही!

ठळक मुद्दे‘बटन मसाला’! हेच तंत्र वापरून तयार होताहेत  बॅग, पर्स, पडदे, कुशन कव्हर.

- स्नेहल जोशी
 गेले काही दिवस आपण श्ॉम्पू-सॅशे, हिप्पो रोलर, लाइफ-स्ट्रॉ यांसारख्या उदाहरणांद्वारे डिझाइन काय घडवू शकतं हे पाहत आहोत. डिझाइनमुळे आर्थिक स्वातंत्र्य, र्शम-मुक्ती, आरोग्य-उन्नती, विद्यार्जन साध्य झालेलं आपण आजवरच्या लेखांमधून पाहिलंच आहे. या सगळ्यातून एव्हाना डिझाइनच्या शक्तींचा अंदाज तुम्हाला आला असणारच. त्यातलाच एक नवा पैलू आज मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे. तो आहे फॅशन जगतातला. फॅशन म्हटल्यावर जरा साशंक झाला असाल - त्यात काय ताकद? फॅशन मुळातच क्षणभंगूर नाही का? असे प्रश्न लगेच डोकावले असतील. ते योग्यही आहेत. मागच्याच लेखात हृषिकेशनं म्हटल्याप्रमाणे जगातले 90 टक्के डिझाइनर हे केवळ 10 टक्के  जनतेच्या गरजांसाठी कार्यरत असतात. उरलेल्या 90 टक्के लोकांच्या गरजांची पूर्तता कशी होणार? फॅशन डिझाइनचीही तीच गत आहे.
फॅशन शोमध्ये फॅशनच्या नवीन कल्पना, कलाकृती सादर केल्या जातात. त्यामुळे तिथे अतिशयोक्तीचा वापर होत असतो. त्यातून लोकांच्या शरीरावर घालण्यायोग्य कपडे निर्माण करेपर्यंत बरीच मोठी प्रक्रि या घडते. फॅशन जगताची छाप आपल्यावर अप्रत्यक्षपणे; पण खोलवर पडलेली असते हे मात्न निश्चित. याच जगात वावरणारा अहमदाबादस्थित एक फॅशन डिझायनर - अनुज शर्मा. त्याला मात्न फॅशन डिझाइनवर होणारा खर्च, त्यामागे घेतलेली मेहनत, त्यातून होणार्‍या कपड्याचा आणि सामग्रीचा अपव्यय या सगळ्या बाबतीत प्रश्न पडायला लागले. 
होतं काय की, कपडे डिझाइन केले जातात, मग लहान-मोठय़ा मापात, वेगवेगळ्या रंगात ते शिवले जातात, बाजारात येतात आणि विकले जातात. तरीही तुमच्या-आमच्या पसंतीस पडतीलच, चपखल मापात बसतीलच असं नाही. याला काही तोडगा असेल का? साडी आणि धोतरासारखे भारतीय पेहेराव या बाबतीत किती सुटसुटीत आहेत. मापाचा प्रश्न तर नाहीच शिवाय एकच साडी कितीतरी पद्धतींनी नेसता येते. तेव्हा ड्रेस डिझाइन करण्यापेक्षा पेहेरावाचं तंत्न विकसित करता आलं तर? या प्रेरणेतून सतत विचार करत असताना अनुजचं लक्ष शर्टच्या बटणांकडे गेलं. दोन कापडांना एकत्न आणण्याचं, जोडण्याचं सोपं तंत्न. आपल्याच शर्टाची बटणं जर आपण क्र म मोडून वर-खाली लावली तर परिणामी शर्टचा आकार बदलतो. यातून अनुजला मार्ग गवसला.
2011 साली ‘बटन मसाला’ जन्माला आला. सुरुवातीला एक सलग कापड घेऊन त्याच्या अध्र्या भागावर बटणं लावून घेतली आणि अध्र्या भागावर काजी केली. आता हे कापड अंगावर घालून हवं ते बटन हव्या त्या काज्यात घातलं की त्याला आकार मिळणार. पण मग लक्षात आलं की हा काजं-बटन युक्त कपडा तयार करायला कष्टप्रद आहे, शिवाय खूप काजी केल्यानी कपडा लवकर जीर्ण होण्याची शक्यता आहे. यातून पुढे मार्ग म्हणजे काजं न करता रबरबॅण्ड वापरले तर? मग बटन तरी शिवत का बसावं? त्याऐवजी बटन, गोट्या, शिंपले, बिल्ले, खडे असं काहीही कपड्यात ठेवून वरून रबर बांधलं की बटन तयार. डिझाइन सगळ्याच बंधनातून मुक्त झालं. 
एक सलग आयताकृती कपडा, बटन म्हणून जे काही उपलब्ध असेल ते आणि रबरबॅण्ड - फक्त एवढय़ाच सामग्रीतून पेहेरावाचे अनंत प्रकार अनुजनी साध्य केले. कुठेही कापलं नाही की शिवलं नाही त्यामुळे कापडाचा एकही तुकडा वाया गेला नाही. मशीनचा वापर नाही त्यामुळे ऊर्जाही खर्च झाली नाही. पेहेरावाची एखादी पद्धत पसंत न पडल्यास, आपण आपल्या मनाने पद्धत बदलू शकतोच. त्यामुळे डिझायनरला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर मिळालच; पण ते ग्राहकापर्यंतसुद्धा पोहोचलं हे अधिक महत्त्वाचं. अनुजच्या मते बटन मसाला हे प्रॉडक्ट नसून तंत्न आहे. या तंत्नामुळे फॅशन अर्थगणितातून स्वतंत्न होतं.
लॅकमे फॅशन वीकमध्ये अनुजचं डिझाइन खूप गाजलं. पण या डिझाइनची ताकद आणि जबाबदारी फॅशन वीकहून खूप जास्त आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. एखाद्या मोठय़ा फॅशन लेबलबरोबर सौदा करण्यापेक्षा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय अनुजनी घेतला. हस्तकला, हातमाग व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घ्यायला त्यानं सुरु वात केली. यातून बटन मसालाचे अजून नवे प्रयोग सुरू झाले. पेहेरावच काय; पण हे तंत्न वापरून कारागीर आता बॅग, पर्स, पडदे, कुशन कव्हर या वस्तूदेखील तयार करू लागले.
पण सगळ्यात अनोखी कार्यशाळा झाली ती मुंबईच्या धारावी झोपडपट्टीमध्ये. अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांचा प्रश्न धारावीमध्ये नेहेमीच भेडसावत असतो. त्यात पावसाळा चालू झाला की, तो अजूनच तीव्र होतो. अनुजनं पावसाळ्यात धारावीमधल्या सर्व मुलांना एकत्न बोलावलं आणि त्यांच्या अडचणींबाबत विचारलं. मुलांना पावसात शाळेत जाता येत नाही, स्वत:चा आणि मुख्यत: दप्तराचा पाण्यापासून बचाव करता येत नाही ही सर्वात मोठी अडचण होती. अनुजनं मुलांना आसपास उपलब्ध असलेले जाहिरातींचे फ्लेक्स, जुन्या ताडपत्नी, प्लॅस्टिकच्या पिशव्या असं गोळा करायला सांगितलं आणि बटन मसालाचा वर्ग सुरू झाला. बिल्ले, दगड, गोट्या बटन म्हणून वापरून काही तासातच सगळ्यांचे रेनकोट तयार झाले. एका रेनकोट मागे जेमतेम एक रु पया खर्च.  हे रेनकोट किती सुंदर आहेत हे फोटोत प्रतीत होतंच आहे.
 एखाद्याला वस्तू दान करून त्याच्या गरजा भागवता येऊ शकतात. पण त्याऐवजी स्वत: गरज भागविण्यासाठी माणसाला सक्षम करणं, स्वयंसिद्ध करणं हे नक्कीच अधिक उदात्त ठरतं. आणि डिझाइनमध्ये असलेली ही ताकद वापरणं आज काळाची गरज आहे.

snehal@designnonstop.in
(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

छायाचित्र सौजन्य : अनुज शर्मा