शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणात जिलेटीनचे स्फोट

By admin | Updated: June 3, 2015 01:48 IST

मुळा धरणात मासेमारीसाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बॉम्ब शोधक

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीत आढळून आला. याव्यतिरिक्त भिंतीलगत मच्छिमारांचा विनापरवाना रहिवास, धरणापर्यंत जाण्याचे पाच अनधिकृत मार्ग, मद्यपार्ट्या अशा अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.मुळा धरणाची सुरक्षा किती लवचिक आहे, याबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत मंगळवारी दुपारी गृह विभागाच्या बॉम्बशोधक पथकाने धरण परिसराची कसून पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.पथक पोलीस चौकीजवळ आले असता, तेथील सुरक्षारक्षक व पोलीस गाढ झोपेत असल्याचे आढळून आले़ मुळा धरणावरील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्येही पाच कर्मचारी निवांत पहुडले होते. त्यानंतर पाटबंधारेचे सहशाखा अभियंता सतीश जाधव व अन्य काही कर्मचाऱ्यांना घेऊन पथकाने धरणाच्या मोऱ्यावरून दुर्बिणीद्वारे पाहणी केली असता, मुख्य भिंतीच्या पश्चिम बाजूला मच्छिमारांच्या तीस अनधिकृत झोपड्या आढळल्या. या मच्छिमारांचे नाव, पत्ता, तसेच कुठलीही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. पोलीस चौकी धरणाच्या मुख्य भिंतीपासून थेट तीन किलोमीटरवर का, या प्रश्नावरही कर्मचारी अनुत्तरित होते. पोलीस चौकी मुख्य भिंतीजवळच हवी, असा अभिप्राय पथकाने नोंदवला.कहर म्हणजे धरणावर पोहोचायला मुख्य मार्ग सोडून इतर पाच अनधिकृत मार्ग असल्याचे समोर आले. या पाच प्रवेशद्वारातून कोणीही अवघ्या काही मिनिटांत धरणावर येऊन घातपात करू शकतो, ही नोंदही पथकाने घेतली. (तालुका प्रतिनिधी)