शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

योगाभ्यासातून मोक्षप्राप्तीकडे

By admin | Updated: June 19, 2015 23:46 IST

दुखणे उद्भवले की सगळे उपचार करून झाल्यावर लोक योगसाधनेचा आधार घेतात. यासाठी योगासनांकडे वळणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्याही बाबतीत तसेच काहीसे झाले.

दुखणे उद्भवले की सगळे उपचार करून झाल्यावर लोक योगसाधनेचा आधार घेतात. यासाठी योगासनांकडे वळणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्याही बाबतीत तसेच काहीसे झाले. आधुनिक जीवनशैली, बैठे काम या सगळ्यांमुळे पाठीचे दुखणे आले. २००३ साली मी माझे शारीरिक दुखणे घेऊन वाशी येथील योग विद्यानिकेतनचा मार्ग धरला. तीन महिन्यांच्या माझ्या योगाभ्यासानंतर मला वाशी योग विद्यानिकेतनचे विजय चिटणीस या योगशिक्षकांनी टिचर ट्रेनिंग कोर्स करण्याचा आग्रह धरला. माझ्यामध्ये असलेली जिद्द, मेहनत पाहून मी एक चांगला योगशिक्षक होऊ शकतो असे त्यांना वाटले आणि इथून खरा माझा योगविद्येचा प्रवास सुरू झाला. २००४ साली मी योगशिक्षक झालो. योगशिक्षक झाल्यानंतर या योगविद्येचा अभ्यास करतानाच मला यामधील तत्त्वज्ञानही जाणून घ्यायचे होते. एकीकडे मी स्वत: योगविद्या शिकवत होतो तर दुसरीकडे मी स्वत: योगविद्येचा सखोल अभ्यास करीत होतो. योगाभ्यासाचे संपूर्र्ण ज्ञान मिळविण्यासाठी मी मुंबई युनिव्हर्सिटी आणि नाशिकमध्ये जाऊन योगशिक्षण घेतले. योग म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्यासाठी मला सहा वर्षांचा कालावधी लागला. एम.ए. (योगशास्त्र) हे पदवीचे शिक्षण घेतले आणि माझा या क्षेत्रातला अभ्यास पूर्ण केला. प्रत्येक वेळी वाशीतील योग विद्या निकेतनचे अनमोल सहकार्य लाभले. ज्या योग विद्येने असंख्य फायदे झाले तेच इतरांनाही व्हावे याच उद्देशाने मी नेरूळमध्ये योगसाधना मंदिराची स्थापना केली. सुरुवातीला १८-१९ लोक येथे योगाभ्यासासाठी येत होते, मात्र हाच आकडा आता १५०च्या घरात पोहोचला आहे. माझे गुरू पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचा आदर्श घेऊन ‘योग विद्या घरोघरी’ हे उद्दिष्ट्य समोर ठेवून घराघरात योगाभ्यास पोहोचविण्याचे काम करण्याचे ठरविले. योगाभ्यासातूनच मोक्षप्राप्तीपर्यंतचा प्रवास गाठता येतो. सुदृढ शरीराबरोबर सुदृढ मन असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मन शांत असेल तरच मनुष्य सुखाने जीवन व्यतीत करू शकतो. जन्म, मृत्यू या प्रवाहातून प्रत्येकालाच प्रवास करायचा असतो, पण अध्यात्माच्या जोडीने केलेला हा प्रवास अधिक सुखकर असतो. सध्या मी के.जे. सोमय्या कॉलेजच्या भारतीय संस्कृती पीठम् या ठिकाणी तत्त्वज्ञान या विषयाचा प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे. - साबीर शेख योगगुरू, नेरूळ योग साधना मंदिर(शब्दांकन : प्राची सोनवणे)