शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली मेट्रो स्टेशनवर सापडलं ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांचं घबाड; आकडा पाहून पोलीस हैराण
2
क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते! 
3
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज; पाहा किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ डिसेंबर २०२५: अचानक धनलाभाचा योग, प्रकृतीचा त्रास होणार
6
"६ महिन्यापासून पगार नाही, घर सांभाळणंही कठीण झालं..."; पाकिस्तानातील अधिकाऱ्याचा Video व्हायरल
7
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
8
इंडिगोचे अध्यक्ष मेहतांचा अखेर माफीनामा; म्हणे... चूक झाली, मनापासून माफी मागतो!
9
लोकशाहीच्या पायावरच प्रहार? मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार
10
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
11
वैद्यकीय विश्वाच्या या विचित्र घुसमटीचं काय करावं?
12
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
13
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
14
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
15
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
16
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
17
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
18
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
19
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
20
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
Daily Top 2Weekly Top 5

काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:03 IST

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळ  अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या वाकयुद्धाची परिणती बुधवारी एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात झाली होती. हा वाद शमण्यापूर्वीच आज विधिमंडळाच्या आवारात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळत असलेल्या सविस्तर माहितीनुसार विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तर तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले.

 

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMaharashtraमहाराष्ट्रGopichand Padalkarगोपीचंद पडळकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस