शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोचे अध्यक्ष मेहतांचा अखेर माफीनामा; म्हणे... चूक झाली, मनापासून माफी मागतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 08:01 IST

या काळात आम्ही तुम्हाला योग्य सेवा देऊ शकलो नाही. त्यासाठी आम्ही मनापासून वारंवार माफी मागतो, असे मेहता म्हणाले.  इंडिगोच्या बोर्डाने आता प्रत्येक गोष्ट तपासण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरील तांत्रिक तज्ञांना सहभागी करून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जाणार आहे.

मुंबई :इंडिगोच्या गोंधळामुळे लाखो प्रवाशांना गेल्या आठवभरात जो मनस्ताप सहन करावा लागला, त्याबद्दल चूक झाल्याची कबुली देत इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी माफी मागितली.

एका व्हिडिओ संदेशातून त्यांनी सांगितले की ३ डिसेंबरला अनपेक्षित घटनांच्या मालिकेमुळे इंडिगोची उड्डाण व्यवस्था कोलमडली आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लाखो प्रवासी अडकले.… त्यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व,” असे मेहता म्हणाले.

क्रांती! देशात २ लाख नवे उद्योजक, ‘स्टार्टअप इंडिया’मुळे देशभरात मिळाला २१ लाखांहून अधिक जणांना रोजगार

या काळात आम्ही तुम्हाला योग्य सेवा देऊ शकलो नाही. त्यासाठी आम्ही मनापासून वारंवार माफी मागतो, असे मेहता म्हणाले.  इंडिगोच्या बोर्डाने आता प्रत्येक गोष्ट तपासण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरील तांत्रिक तज्ञांना सहभागी करून संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी केली जाणार आहे. आम्ही काय चुकीचे केले? कुठे गोंधळ झाला? ते आम्ही शोधू… पुन्हा कधीही असे होऊ नये यासाठी सुधारणा करू, असे मेहता म्हणाले. काही आरोपांमध्ये इंडिगोने जाणीवपूर्वक संकट निर्माण केल्याचे म्हटले जात होते. हे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे मेहता यांनी नमूद केले. नवीन पायलट फॅटीग नियमांचे पालन कंपनीने काटेकोर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

२ लाख ६० हजार प्रवाशांना फटका

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगोच्या गोंधळाचा फटका मुंबईतील तब्बल दोन लाख ६० हजार प्रवाशांना बसला आहे. या कालावधीत मुंबईतून कंपनीची एकूण ९०० विमाने रद्द झाल्याचे समोर आले आहे, तर तब्बल १४७५ विमाने किमान अर्धा तास ते कमाल तीन तासांनी उड्डाण घेत असल्याचे चित्र आहे.

प्रवाशांना तात्काळ नुकसानभरपाई द्या, इंडिगोला कोर्टाचे आदेश

इंडिगोची हजारो उड्डाणे रद्द झाल्यानंतर हजारो प्रवासी अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने कंपनीला कठोर फटकार देत 'तात्काळ नुकसानभरपाईची व्यवस्था करा', असा स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने केवळ उड्डाण रद्द झाल्याबद्दलच नव्हे, तर प्रवाशांना झालेल्या इतर सर्व त्रासाबद्दलही भरपाई देण्यास सांगितले.

न्यायालयाने इंडिगोच्या वकिलाला विचारले की,  प्रवाशांच्या हालअपेष्टा झाल्या, त्याचे काय? त्यांना इंडिगोच्या स्टाफचा सामना करावा लागला. काही जण तर आठवडाभर अडकून पडले. त्यांची जबाबदारी कोणाची?

न्यायालयाने म्हटले की, इंडिगोच्या विस्कळीत ऑपरेशन्सच्या कारणांची तपासणी करण्यासाठी आधीच समिती स्थापन झाली असल्याने, या टप्प्यावर कारणांवर भाष्य करणे टाळत आहोत. परंतु, सार्वजनिक हितासाठी आम्ही दखल घेतली आहे. सरकार आणि इंडिगोनेही प्रवाशांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

डीजीसीएने मागविली गोंधळाची सर्व माहिती

इंडिगोची हवाई सेवा गेल्या काही दिवसांपासून कोलमडली असून, याप्रकरणी त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) पीटर एल्बर्स  डीजीसीए कार्यालयात गुरुवारी दुपारी तीन वाजता हजर राहण्याचे तसेच कंपनीच्या कार्यप्रणालीतील अडथळ्यांशी संबंधित संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

डीजीसीएने म्हटले की, हवाई सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी करत असलेल्या उपाययोजना, वैमानिक, कर्मचाऱ्यांच्या भरती आराखड्याची माहिती, वैमानिक व केबिन क्रूची विद्यमान संख्या, रद्द केलेल्या विमान फेऱ्यांची आकडेवारी, रद्द केलेल्या विमान फेऱ्या किंवा प्रवाशांनी रद्द केलेली तिकिटे यांच्या रकमेचा परतावा करण्याची प्रक्रिया याबद्दलची सर्व माहिती इंडिगोकडून मागविण्यात आली.

इंडिगो कंपनीची वाहतूक सेवा कोलमडली. त्या संकटासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका माकपचे नेते ए. ए. रहीम यांनी बुधवारी केली. ते म्हणाले की, अनियंत्रित खासगीकरण आणि नियमांच्या शिथिलतेमुळे हवाई वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेल्या मक्तेदारीच्या परिणामी हे संकट उभे राहिले.

परिस्थिती  लवकर सुरळीत करा. सर्व विमान कंपन्यांनी पुरेसे पायलट ठेवावेत. नियमांचे पूर्ण पालन केले गेले पाहिजे. सरकारने नवीन नियम वेळेत लागू का केले नाहीत, यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo Chairman Mehta Apologizes After Flight Disruptions: 'I Sincerely Apologize'

Web Summary : Indigo Chairman Vikram Singh Mehta apologized for flight disruptions affecting lakhs. He cited unforeseen events on December 3rd, causing significant passenger inconvenience. An investigation involving external experts is underway to prevent future occurrences. The court has ordered immediate compensation to passengers.
टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान