यवतमाळमध्ये तिहेरी हत्याकांड

By Admin | Updated: October 25, 2015 01:30 IST2015-10-25T01:30:19+5:302015-10-25T01:30:19+5:30

रविदास नगरात मच्छीपूल परिसरातील दोन कुटुंबांमध्येमागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची परिणती शनिवारी तिहेरी हत्याकांडात झाली. रात्री ९.१५ च्या सुमारास

Yavatmal triple killings | यवतमाळमध्ये तिहेरी हत्याकांड

यवतमाळमध्ये तिहेरी हत्याकांड

यवतमाळ : रविदास नगरात मच्छीपूल परिसरातील दोन कुटुंबांमध्येमागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची परिणती शनिवारी तिहेरी हत्याकांडात झाली. रात्री ९.१५ च्या सुमारास घडलेल्या या थरारात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर असल्याचे वृत्त आहे.
मोहम्मद इकबाल मोहम्मद जब्बार, मोहम्मद जावेद ऊर्फ कालू मोहम्मद जब्बार आणि बबलू ऊर्फ इमरान शेख रमजान अशी मृतांची नावे असून घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत. शासकीय रुग्णालय परिसर आणि घटनास्थळी प्रचंड तणाव असल्याने वृत्त लिहिस्तोवर आरोपींची माहिती मिळाली नव्हती. प्राप्त माहितीनुसार मच्छीपूल परिसरातील दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद होता. वेळोवेळी त्यांच्यात भांडण व्हायचे. शनिवारी दुपारपासूनच त्यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. अखेर रात्री दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढविला. (प्रतिनिधी)

Web Title: Yavatmal triple killings