शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

याकुबच्या ‘डेथ वॉरंट’साठी हालचाली तीव्र

By admin | Updated: May 24, 2014 01:05 IST

नागपूर मुंबईत बॉम्बस्फोट घडवून अनेक निरपराधांचे बळी घेणारा दहशतवादी याकुब अब्दुल रजा मेमन याच्या ‘डेथ वॉरंट‘साठी संबंधित वुर्तळात हालचाली तीव्र झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रचंड

२७ मे ते ७ जूनदरम्यान ‘झटका’ : लवकरच मिटिंग

नरेश डोंगरे -नागपूर मुंबईत बॉम्बस्फोट घडवून अनेक निरपराधांचे बळी घेणारा दहशतवादी याकुब अब्दुल रजा मेमन याच्या ‘डेथ वॉरंट‘साठी संबंधित वुर्तळात हालचाली तीव्र झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. मात्र, २७ मे ते ७ जूनच्या दरम्यान नागपुरातच याकुबला फासावर लटकवल्या जाऊ शकते, अशी खास सूत्रांची माहिती आहे. अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या टायगर मेमन, याकुब मेमन आणि त्याच्या साथीदारांनी १९९३ साली मुंबईत ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून २५७ निरपराधांचे बळी घेतले. कित्येकांना जीवघेण्या जखमा दिल्या. अनेकांना कायमचे अपंगत्वही या बॉम्बस्फोटामुळे आले. २९ मार्च २०१३ ला याकुबला फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. यापूर्वीपासूनच याकुब नागपूरच्या कारागृहात बंदिस्त आहे. मात्र, त्याला कोर्टाकडे पुनर्विचार याचिका आणि राष्टपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा होती. त्यानुसार, या प्रक्रियाही पार पडल्या. राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांनी दहशतवादी याकुबचा दयेचा अर्ज नुकताच फेटाळून लावला. त्यामुळे आता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी शेवटची उरलेली प्रक्रिया म्हणजे ‘डेथ वॉरंट’ काढण्याची होय. बोरवणकर म्हणतात... माहिती नाही ! याकुबला नागपूरच्या कारागृहातच फासावर लटकवण्यात येईल, असे मानले जाते. कारण येथे व्यवस्था असताना त्याला येरवड्यात नेणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य होणार नाही. याकुबचा डेथ वॉरंट तसेच त्याला फासावर कुठे लटकवायचे (नागपूर की येरवडा) याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच एक बैठक पार पडणार असून, त्यात गृहमंत्री आर.आर. पाटील, गृहसचिव, पोलीस महासंचालक संजीव दयाल राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक (एडीजी) मीरा बोरवणकर आणि नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचीही उपस्थिती राहणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. या अनुषंगाने तुरुंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत ‘सध्या मला कोणतीही माहिती नाही. राज्य सरकारकडून कसल्याही सूचना अथवा पत्र आपल्याकडे आले नाही’, असे बोरवणकर म्हणाल्या. काय आहे डेथ वॉरंट एखाद्या गुन्हेगाराला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि राष्ट्रपतींनीही त्याची दयायाचिका फेटाळली तर, त्याला मृत्युदंड देण्यापूर्वी न्यायालयातून एक खास आदेश काढला जातो. या आदेशालाच संबंधित गुन्हेगाराच्या मृत्यूचा आदेश अर्थात ‘डेथ वॉरंट’ म्हणतात. त्या गुन्हेगाराला ज्या न्यायमूर्तीने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, त्याच न्यायमूर्तींकडून डेथ वॉरंट काढला जातो. ते न्यायमूर्ती निवृत्त झाले असतील तर दुसर्‍या न्यायमूर्तींकडून डेथ वॉरंट काढला जातो. वॉरंट निघाल्यानंतर सरकार (तुरुंग प्रशासन) त्याची माहिती संबंधित गुन्हेगारासोबतच त्याच्या नातेवाईकांनाही देते. ही माहिती कळविताना गृहमंत्र्यांसह संबंधितांच्या संमतीने फाशीची तारीख निश्चित केली जाते. याकुबचा भाऊ या बॉम्बस्फोटाचा मास्टर मार्इंड आणि आरोपी आहे. तो फरार असून, याकुबचे नातेवाईक मुंबईत राहतात.