शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटवर उतारा !

By admin | Updated: December 17, 2014 00:27 IST

महाराष्ट्रात दोन दिवसांत झालेल्या गारपीटीमुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असून कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांकरिता १० ते २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत

शेतकऱ्यांना हेक्टरी १० ते २५ हजारांची मदतनागपूर : महाराष्ट्रात दोन दिवसांत झालेल्या गारपीटीमुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले असून कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक पिकांकरिता १० ते २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधिमंडळाच्या उभय सभागृहात केली. आपत्तीग्रस्तांच्या आर्थिक मदतीकरिता पैसे कमी पडू नये याकरिता यावर्षी प्रत्येक आमदाराला दिला जाणारा दोन कोटी रुपयांचा निधी गोठवून ७०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असल्याचेही खडसे यांनी जाहीर केले. खडसे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.ब्रिटीश कालीन पैसेवारीची पद्धत बदलून विकास देशमुख समितीने केलेल्या शिफारशीनुसार नवी पद्धत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून लागू केली जाईल तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या विम्याच्या कक्षेत आणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत मदत देण्याकरिता विमा कंपन्यांसोबत चर्चा सुरु असल्याचे खडसे यांनी सांगितले.खडसे म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात १४ ते १७ तारखेला झालेल्या गारपीटीमुळे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले होते. आता १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत झालेल्या गारपीटीमुळे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ३२ तालुक्यातील ८९३ गावातील एकूण एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. कोरडवाहू पिकाकरिता सरकारी नियमानुसार १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांकरिता १५ हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक फळबागांकरिता २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. द्राक्ष, डाळिंब, आंबा यासारख्या फळांच्या नुकसानीकरिता नॅशनल हॉर्टीकल्चर यांच्यामार्फत हेक्टरी ७० ते ८० हजारांची मदत मिळवून देण्याकरिता केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा झाल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. गारपीटीमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत दिली जात होती. आता मुख्यमंत्री निधीतून आणखी दीड लाखांची मदत देऊन अडीच लाख देण्यात येतील. मोठी जनावरे मरण पावल्यास २५ हजार, मध्यम जनावरांकरिता १० हजार तर लहान जनावरांकरिता ५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पक्क्या घरांचे नुकसान झाले असेल तर ७० हजार रुपये, कच्च्या घरांकरिता २५ हजार रुपये तर अंशत: नुकसानीकरिता १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ज्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये तर ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना २५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा खडसे यांनी केली.गारपीटीमुळे फळपिकांचे होणारे नुकसान टाळण्याकरिता इटलीमधील आच्छादन असलेल्या शेड शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार सुरु असल्याचे खडसे यांनी सांगितले. या शेडकरिता सहा लाख रुपये खर्च येतो. या शेडवरील ४० टक्क्यांचा आयातकर केंद्र सरकारने माफ केला व शेडकरिता अनुदान दिले तर कमी दरात ही शेड फळपिकांकरिता उपलब्ध होईल, असे खडसे म्हणाले. सध्या पिकाच्या नुकसानीकरिता विमा कंपन्यांकडून संपूर्ण भरपाई प्राप्त होत नाही. शेतकऱ्यांना शंभर टक्के भरपाई मिळवून देण्याकरिता विमा कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे, असे ते म्हणाले. विधानसभेत अजित पवार, छगन भुजबळ व राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तर विधान परिषदेत सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे यांनी हेक्टरी मदतीची मागणी लावून धरली. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने उभय सभागृहात सभात्याग केला. (विशेष प्रतिनिधी)