शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक दलात महिला वाढल्या

By admin | Updated: July 24, 2015 00:55 IST

इतर क्षेत्राप्रमाणेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण विभागातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

वैशाली मलेवार, नवी दिल्लीइतर क्षेत्राप्रमाणेच पुरुषांचे वर्चस्व असलेल्या संरक्षण विभागातही स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या एका अहवालानुसार २०१० ते १७ जुलै २०१५ दरम्यान वायुसेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या (एसएससी ) माध्यमाने झालेल्या भर्तीत स्त्रियांनी पुरु षांसोबत चांगली स्पर्धा केली. यावेळी ९११ पुरु ष अधिकाऱ्यांच्या तुलनेत ८५९ महिला अधिकाऱ्यांची भर्ती झाली आहे .वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी एस. एस. बिरदी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, वायुसेनेत महिलांना युद्ध विभाग वगळता इतर सर्व विभागात प्रवेश मिळतो. विशेष म्हणजे या विभागांमध्ये गेल्या पाच वर्षात महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. युद्धादरम्यान शत्रूपक्ष महिला अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक देत असल्याने महिलांना सशस्त्र दलात पाठविता येत नाही. मात्र इतर सगळ्या विभागात महिला अधिकारी पुरु ष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काम करतात,असेही बिरदी यांनी स्पष्ट केले. यावर्षी गेल्या ६ महिन्यात १०३ पुरु ष आणि ९९ महिलांनी कमिशन मिळवली आहे . गेल्यावर्षी १६३ महिला आणि १४० पुरु षांनी कमिशन मिळवली होती. एक तृतीयांश भागीदारी वायुसेनेच्या तुलनेत थल आणि नौसेनेत कमिशन मिळवणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे . उपरोक्त कालावधीत थल सेनेत २११८ पुरु ष अधिकाऱ्यांना कमिशन मिळाली या तुलनेत महिला अधिकाऱ्यांची संख्या फक्त ६८६ होती. ही संख्या पुरु ष अधिकऱ्यांच्या तुलनेत एक तृतीयांश आहे . नौसेनेत मात्र कमिशन मिळवणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची संख्या एक चतुर्थांश आहे. नौसेनेत या कालावधीत १४४१ पुरु ष आणि या तुलनेत फक्त ३२३ महिला अधिकारी कमिशन मिळवू शकल्या.