शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जॅक्सन वधा’चा साक्षीदार ‘विजयानंद’वर हातोडा!

By admin | Updated: October 13, 2015 02:56 IST

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे येथील कान्हेरे बंधूंनी तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॅक्सन याचा विजयानंद थिएटरमध्ये केलेला वध.

संजय पाठक,  नाशिकदेशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान म्हणजे येथील कान्हेरे बंधूंनी तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॅक्सन याचा विजयानंद थिएटरमध्ये केलेला वध. विजयानंदचे अस्तित्व कायम राहावे, ही चित्रपटगृह मालकाच्या चौथ्या पिढीची तळमळ आहे. मात्र, पोलिसी कार्यवाहीमुळे इतिहासातील हे पान गळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारतंत्र्यात विजयानंद एक नाट्यगृह होते आणि येथेच २१ डिसेंबर १९०९ रोजी ‘संगीत सौभद्र’ पाहण्यासाठी गेलेल्या जॅॅक्सनचा कान्हेरे बंधूनी गोळ्या घालून खून केला. त्यामुळे ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणले. कान्हेरे बंधू व विजयानंदचे नाव इतिहासात कायमचे लिहिले गेले. १९०६मध्ये शंकरशेट चुंबळे यांनी विजयानंदची उभारणी केली. प्रारंभी येथे कळसूत्री बाहुल्यांचे खेळ होत असत. कालांतराने नाटके सादर होऊ लागली. १९५०मध्ये विजयानंद नाट्यगृहाचे चित्रपटगृहात रूपांतर झाले. सुरुवातीला हिंदी-मराठी आणि नंतर केवळ मराठी चित्रपटांसाठी विजयानंद हक्काचे घर बनले.आता केवळ चित्रपटगृह चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करताना वारसाला तसा अधिकार देता येणार नाही, अशी तांत्रिक सबब पुढे करून सहा महिन्यांपूर्वी परवाना रद्द करण्यात आला आणि आता तर प्रशासनाने पोलिसांकरवी चित्रपटगृहच बंद केल्याची तक्रार विद्यमान संचालक विनय चुंबळे यांनी केली आहे.चित्रपटगृहाचा परवाना आधी त्यांचे आजोबा वसंतराव चुंबळे यांच्या नावावर होता. २००७मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याऐवजी आपले नाव लावून परवाना नूतनीकरण करावे, यासाठी विनय यांनी रीतसर अर्ज दिला. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अचानक सहा महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी ‘विजयानंद’ व त्यालगतच्या ‘दामोदर’चादेखील परवाना रद्द झाल्याने ते बंद करण्याचे आदेश बजावले.