शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

मी पुन्हा येणार...! वादळात गेलेली सत्ता थंडी पुन्हा मिळवणार; केव्हापासून... हवामानाचा अंदाज पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 07:29 IST

Winter In Maharashtra: नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिणेकडील चक्रीवादळने पळवून लावलेली थंडी उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. ८ ते १३ डिसेंबरदम्यान राज्यातील शहरांचा पारा १०, तर मुंबई महानगरातील शहरांचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. परिणामी, आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांवर आला होता, तर मुंबई १६ अंशांवर उतरली होती. मात्र, हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली. राज्याच्या बहुतांशी भागात हवामान ढगाळ नोंदविले गेले. काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली. आता हवामान पालटणार असून, राज्यासह मुंबईला थंडीची मजा लुटता येणार आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील शहरांच्या किमान तापमानात बऱ्यापैकी घसरण होईल. मराठवाड्यातही तापमान खाली येईल. कमाल ३५ आणि किमान तापमान १०  ते १३ अंश नोंदविले जाईल. विदर्भातही हलक्याशा थंडीची नोंद होईल, तर मुंबईसह लगतच्या परिसरातील शहरांचे किमान तापमान १३ ते १५ अंश नोंदविली जाईल.
    - अथ्रेया शेट्टी,
    हवामान अभ्यासक.

टॅग्स :environmentपर्यावरण