शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मद्य कारखान्याने सुखना धरणात कालवले विष!

By admin | Updated: June 22, 2015 02:40 IST

औरंगाबाद तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांची तहान भागविणाऱ्या, हजारो हेक्टर शेती फुलविणाऱ्या अन् देशीविदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सुखना धरणात

विनोद काकडे/संजय देशपांडे, औरंगाबादऔरंगाबाद तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांची तहान भागविणाऱ्या, हजारो हेक्टर शेती फुलविणाऱ्या अन् देशीविदेशी पक्ष्यांचे आवडीचे ठिकाण असलेल्या सुखना धरणात चक्क विष कालवले जात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून हा भीषण आणि भयावह प्रकार समोर आला. कोणतीही प्रक्रिया न करता विषारी रसायन थेट सुखना धरणात सोडत हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचे काम शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको या मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीकडून गेल्या दोन वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे.१९७२ साली बांधलेले सुखना धरण जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरले आहे. मात्र, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिको एनव्ही डिस्टलरीज् महाराष्ट्र लि़ या धान्यापासून मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीतून निघणारे विषारी रसायन या धरणात सोडले जात असल्याने परिसरातील हजारो नागरिक, पशुधन आणि शेती धोक्यात आली आहे़ तसेच धरणातील पाण्याचा रंगही बदलला आहे. या दूषित पाण्यामुळे शेती उजाड होत आहे, जनावरे मरत आहेत, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशा तक्रारी ‘लोकमत’कडे आल्या होत्या. ‘लोकमत’ प्रतिनिधींनी रॅडिको ते सुखना धरण, अशी पंधरा किलोमीटरची परिक्रमा केली. तेव्हा या कंपनीत सत्ताधारी मोठ्या राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याने कोणताही विभाग कारवाई करण्यासाठी धजत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. राजकीय दबावामुळेच कारवाई नाहीहजारो नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या रॅडिकोविरुद्ध काहीच कारवाई होत नसल्याने वैतागलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आ.नि. काटोले यांच्याशी संपर्क साधून संभाषणाचे रेकॉर्डिंग केले. तेव्हा काटोले यांनी ‘आमच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे’ असे म्हणत हा दबावच कारवाईला अडथळा निर्माण करीत असल्याची कबुली दिली. त्यांचे हे रेकॉर्डिंगही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.पाणी रॅडिकोचेच -तहसीलदारपरिसरातील रहिवाशांच्या तक्रारीनंतर औरंगाबादचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी ५ जून २०१५ रोजी तेथे जाऊन पाहणी करीत पंचनामा केला. तहसीलदारांनी आपल्या पंचनाम्यात हे पाणी रॅडिको कंपनीच सोडत असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. रोगराई पसरत आहे. नागरिक आणि पशू-पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्या पंचनाम्याची प्रतही ‘लोकमत’कडे उपलब्ध आहे.पोलीस म्हणतात, कारवाई व्हावीयाबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर १ एप्रिल २०१५ रोजी करमाड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर.डी. चव्हाण, डी.जी. बेले, अशोक वाघ यांनी मध्यरात्रीनंतर २ वाजता रॅडिको कंपनीपासून ते कुंभेफळपर्यंत पाहणी केली. तेव्हा ही कंपनीच नाल्यात विषारी रसायनयुक्त पाणी सोडत असल्याचे आढळून आले. रॅडिको कंपनीविरुद्ध सीआरपीसी कलम १३३ (ख) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल करमाड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हर्ष पोद्दार यांनी तहसीलदार मुंडलोड यांना दिला होता. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.पाझर तलाव रक्ताळलावोखार्डच्या बाजूला असलेला पाझर तलाव रॅडिकोच्या केमिकलमुळे अक्षरक्ष: रक्ताळलेला दिसून आला. तलावातील संपूर्ण पाणी केमिकल मिसळल्याने लालभडक झालेले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने हा तलाव पूर्ण भरला आहे. त्यामुळे पुढे सांडव्यावरून हे पाणी कुंभेफळकडे जाणाऱ्या नाल्यात पडताना अक्षरक्ष: लाल रंगाचा धबधबा कोसळावा, असे चित्र दिसत आहे.