विदर्भात वादळी पावसाचा इशारा

By Admin | Updated: May 6, 2015 06:27 IST2015-05-06T06:27:15+5:302015-05-06T06:27:15+5:30

विदर्भात बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Windy rain forecast in Vidharba | विदर्भात वादळी पावसाचा इशारा

विदर्भात वादळी पावसाचा इशारा


पुणे : विदर्भात बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस पडला. वेधशाळेकडे ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात भर उन्हाळ्यात आठवडाभर पावसाचे सावट राहणार आहे. सोमवारपासून विदर्भात काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राज्यात ठिकठिकाणीही पावसाने हजेरी लावली. बुधवारी विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढील आठवडाभर पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. मंगळवारी राज्यात महाबळेश्वरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्या ठिकाणी काही तासांतच ५४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुण्यातही ४.४ मिमी पाऊस पडला. तसेच पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ सातारा येथे ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तीव्र उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक प्रमुख शहरांतील कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भातील उन्हाची तीव्रताही कमी झाली आहे. मंगळवारी राज्यात जळगाव येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यांतील काही प्रमुख शहरांतील
कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
४पुणे ३८.६, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३६.४, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४२.८, नाशिक ४०, सांगली ३७.३, सातारा ३७.६, सोलापूर ४०.७, मुंबई ३५, अलिबाग ३५, रत्नागिरी ३४.३, उस्मानाबाद ३८.६, औरंगाबाद ४०, परभणी ४०.४, नांदेड ३८, अकोला ४२.३, बुलढाणा ३९.७, चंद्रपूर ३९, नागपूर ४०.५, वाशिम ३९.६, वर्धा ४०.५, यवतमाळ ३८.२.

Web Title: Windy rain forecast in Vidharba