शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:00 PM

Maharashtra Election 2019 : सत्तेच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही; भाजपाचा ठाम नकार

मुंबई: सत्ता स्थापनेवरून शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला 'सामना' कायम राहणार असल्याचं दिसत आहे. शिवसेना लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडेल, असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'सामना'मधून राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरुन भाजपाला लक्ष्य केल्यानंतर आज सकाळी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल केलं होतं. त्यावर भाष्य करताना राष्ट्रपती राजवटीची भाषा म्हणजे राज्यानं दिलेल्या जनादेशाचा अपमान असल्याचं राऊत यांनी म्हटलं. 'घटनेचा विचार केल्यास राष्ट्रपती हे देशातलं सर्वोच्च पद आहे. त्या पदाचा भाजपाकडून गैरवापर होत असेल तर ते देशासाठी धोकादायक आहे,' असं राऊत म्हणाले. सत्ता स्थापनेबद्दल मोदी, शहांशी चर्चा झाली का?; पवार म्हणतात...पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केलं. शिवसेना, भाजपा वगळता राज्यातील इतर सर्व पक्ष एकमेकांशी संवाद साधत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पवारांची भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली होती. मात्र त्यात राज्यातील राजकारणाबद्दल चर्चा झाल्याचं ते म्हणाले. आम्ही लवकरच वेट अँड वॉचची भूमिका सोडू असं म्हणत असतानाच शिवसेना अखेरच्या क्षणापर्यंत युतीधर्माचं पालन करेल हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत.कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणीगेल्या काही दिवसांपासून शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपावरून कलगीतुरा सुरू आहे. राज्यात 56 जागा जिंकणारी शिवसेना सत्तेच्या समान वाटपासाठी आग्रह आहे. लोकसभेवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेत समान वाटा मिळावा. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. मात्र पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय गृह, अर्थ, महसूल, नगरविकास यांच्यासारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याची भूमिका भाजपानं घेतली आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस