शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाजेन्को’ च्या प्रकल्पाची पाहणी करणार

By admin | Updated: December 17, 2014 00:27 IST

पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने

रामदास कदम : त्रुटी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासननागपूर : पर्यावरण मंत्रालयाचे नियम मोडून महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेन्को) चंद्रपूर वीज केंद्रात न धुतलेला कच्चा कोळसा वापरत असल्याची बाब राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गंभीरतेने घेतली आहे. या केंद्राला येत्या दोन-तीन दिवसांत भेट देऊन पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कदम यांनी मंगळवारी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे चंद्रपूर वीज केंद्रात ‘महाजेन्को’ कडून उल्लंघन केले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. याबाबत विचारणा केली असता, पर्यावरण विभागाचे सचिव राजीव कुमार यांच्यासमवेत या केंद्राची पाहणी करूव नेमके कशाप्रकारे पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे किती प्रमाणात पालन होत आहे, याचा आढावा घेऊ. जर यात त्रुटी आढळल्या तर नियमानुसार निश्चित कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कदम यांनी राज्यातील पर्यावरणाबाबत चर्चा केली. जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून कुठल्याही स्थितीत आम्ही नमते घेणार नाही, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. कोकणातील स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पासाठी कोकणातीलच मातीचा उपसा करून समुद्रात भराव घालण्यात येईल. यामुळे कोकणच्या पर्यावरणाची हानी होऊ शकते. संपुआ सरकारने फ्रेंच कंपनीसोबत एक लाख मेगावॅट ऊर्जानिर्मितीसाठी करार केला. परंतु देशातील निरनिराळ्या ठिकाणी ही ऊर्जा निर्माण होऊ शकते, मग जैतापूरचा आग्रह का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)आम्ही फडणवीसांच्या पाठीशीशिवसेना व भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. विचारभिन्नता जरी असली तरी त्यामुळे राज्याच्या प्रशासनावर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तबगार व हुशार व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचे शिखर गाठेल. आमचा पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले.