गडकरला जामीन मिळणार का?

By Admin | Updated: June 18, 2015 02:42 IST2015-06-18T02:42:06+5:302015-06-18T02:42:06+5:30

हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील आरोपी विधी सल्लागार जान्हवी गडकर हिच्या जामीनावर दोन दिवसांनी कुर्ला न्यायालयात सुनावणी होणार आहे़.

Will Gadkari get bail? | गडकरला जामीन मिळणार का?

गडकरला जामीन मिळणार का?

आॅडी अपघात प्रकरण

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील आरोपी विधी सल्लागार जान्हवी गडकर हिच्या जामीनावर दोन दिवसांनी कुर्ला न्यायालयात सुनावणी होणार आहे़. पूर्व द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला़ याप्रकरणी गडकरला अटक करण्यात आली आहे़
सध्या गडकर न्यायालयीन कोठडीत आहे़ या अपघातात तिला दुखापत झाली असल्याने उपचारासाठी जामीन मंजूर करावा, अशी मागणी करणारा अर्ज अ‍ॅड़ अमित सबनीस यांनी केला़
या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली़ गडकरला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही़ त्यामुळे ही सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती सरकारी पक्षाने केली़ ती मान्य करत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Will Gadkari get bail?