शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसाठी पक्षांची कार्यालये हटविणार

By admin | Updated: March 11, 2015 02:05 IST

मेट्रो-३ प्रकल्पाच्या उभारणीसाठी विधानभवनजवळ स्थानक उभारण्याकरता काही शासकीय कार्यालये वा विविध राजकीय पक्षांची

मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या उभारणीसाठी विधानभवनजवळ स्थानक उभारण्याकरता काही शासकीय कार्यालये वा विविध राजकीय पक्षांची कार्यालये हटविण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, गिरगाव भागातील २०० च्या वर चाळी या प्रकल्पासाठी हटविण्यात येणार आहेत ही बाब मात्र खरी नाही. गिरगाव स्थानकासाठी बाधित इमारतीतील रहिवाशांसोबत चर्चा करून त्यांच्या पुनर्वसनाबाबतचा आराखडा तयार करणे प्रस्तावित आहे. शहीद भगतसिंग मार्ग आणि फ्री प्रेस मार्गावरील शासकीय व राजकीय कार्यालयांच्या स्थलांतराचा व पर्यायी पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्या बाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे. खासगी इमारती, पक्ष कार्यालय व शासकीय कार्यालयांचे पुनर्वसन नजिकच्या परिसरात भाडे तत्वावरील इमारतींमध्ये करण्याचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. म्हाडाचे बोगस लाभार्थी; ५१ प्रकरणांमध्ये चौकशी मुंबईत म्हाडाची घरे बळकावण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची ५१ प्रकरणे तपासण्यात येत असून या प्रकरणी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले.या प्रकरणी म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी चौकशी करीत आहेत, असे त्यांनी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नात लेखी उत्तर देताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)