शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली आरोपींना खटल्यांसाठी कोर्टात हजर का करीत नाही?

By admin | Updated: September 11, 2014 03:18 IST

नक्षली कैद्यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात का उपस्थित करण्यात येत नाही

नागपूर : नक्षली कैद्यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात का उपस्थित करण्यात येत नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली आणि यासंदर्भात राज्य शासनाने एक आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश दिले. एका जनहित याचिकेवरील सुनावणीत न्या. वासंती नाईक व न्या. पुखराज बोरा यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.नागपूर व अमरावती कारागृहातील नक्षली कैद्यांविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, अहेरी इत्यादी शहरांतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यालयांमध्ये खटले सुरू आहेत़ परंतु, सुरक्षेच्या कारणावरून जानेवारी-२०११ पासून त्यांना न्यायालयात हजर करणे सतत टाळण्यात येत आहे़ याविरुद्ध मानवाधिकार संरक्षण समितीच्या सदस्य डॉ़ शोमा सेन यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गडचिरोलीत कारागृह झाल्यास नक्षली कैद्यांना न्यायालयात उपस्थित करणे कठीण जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.शासनाने गडचिरोलीत कारागृह बांधले आहे, पण त्यासंदर्भात वाद निर्माण झाला आहे. आवश्यक सुविधा नसल्यामुळे कारागृह प्रशासनाने इमारतीचा ताबा घेतलेला नाही. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने गेल्या तारखेला सार्वजनिक बांधकाम विभाग व कारागृह प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन वाद निकाली काढण्याचे व १० सप्टेंबरपर्यंत बैठकीतील निर्णयाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. सरकारी वकिलाने अहवाल सादर करण्यासाठी आज पुन्हा चार आठवड्यांचा वेळ मागून घेतला. पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड़ कैलाश नरवाडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)