शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अन् काँग्रेस आसने-सामने: सावरकरांचा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेला का येतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 09:48 IST

स्वा. सावरकर यांना वादाचे केंद्रबिंदू ठरविण्यात येत आहे का?

अतुल भातखळकर, भाजप आमदारळात सावरकरांच्या तथाकथित पत्रांचा, माफीचा उल्लेख २००३ पासून चालू झाला. त्याचे कारण असे आहे की, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या दृष्टीने देशभरात प्रतिष्ठा मिळायला लागली. वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे तैलचित्र संसदेच्या सभागृहात लागले. तेव्हापासून या डाव्या इतिहासकारांनी जे ‘सो कॉल्ड लेफ्ट लिबरल’, आहेत त्यात पहिले नाव घ्यावे लागेल ए. जी. नुरानी यांचे. त्यावेळी काही लेख लिहिले, मग हे सावरकरांचे तथाकथित माफीपत्र त्यांनी त्या लेखांमधून मांडले. त्यामुळे याचे मूलभूत कारण हे आहे की, हिंदुत्वाचा आणि सावरकरांचा वैचारिक विजय होत आहे आणि राजकीयदृष्ट्या त्यांचे विचार समाजाने स्वीकारलेले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि पर्यायाने या विचारांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे. २००४ मध्ये विधान परिषदेचे सभापती ना. स. फरांदे यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांचे तैलचित्र लागले. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि काँग्रेसने त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. २००२ पासून या सगळ्या गोष्टी काँग्रेसने चालू केल्या. मणिशंकर अय्यर यांनी अंदमानातील ज्योतीवरील सावरकरांच्या पंक्ती काढल्या. जसा प्रभाव वाढत चालला, तसा हा प्रयत्न वाढत गेला. 

सचिन सावंत, काँग्रेस नेतेदेशातील वैचारिक संघर्ष आहे. एका ठिकाणी गांधीजींचा विचार आहे, दुसरीकडे सावरकर-गोळवलकरांचा विचार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार त्या विचारांनी देश पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. गांधीजींनी दिलेल्या विचारांनी हा देश चालला, आता मार्ग बदलायचा प्रयत्न होतोय. त्यामुळे हा विषय येणे साहजिकच आहे. देशात मने दुभंगवण्याचे काम करणाऱ्यांना विरोध करण्यासाठी भारत जोडो यात्रा आहे. त्यामुळे त्यांचे जे आदर्श आहेत त्यांचे खरे स्वरूप लोकांसमोर आणणे हेदेखील गरजेचे ठरते. पंडित नेहरूंबद्दल आता भाजप जे पसरवते आहे ती अतिशयोक्ती आहे. अनेक जणांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांनी अशा पद्धतीने माफीनामे लिहिले नव्हते. सावरकरांना गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रविरोधी हिंदू आवृत्ती आणि सावरकरांचे हिंदुत्व प्रतिक्रियात्मक, नकारात्मक हिंदुत्व आहे, म्हटले होते. सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या संघाला दिली, तिलाच नाकारण्याचे काम गोळवलकरांनी केले होते. त्याचा निषेध भाजप कधी करणार ते सांगावे. दुसरीकडे सावकरांबद्दल इतकी आत्मीयता आहे, तर त्यांच्या विचारांवर भाजप का चालत नाही. गोहत्याबंदीचा कायदा हा सावरकरांच्या विचारांच्या विरोधातला आहे. सावरकरांच्या विचारात वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्याचाही अवलंब भाजपने करावा. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर