Why did BJP lose power ?; Sharad Pawar told the story of devendra fadanvis | भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची सामनासाठी संजय राऊतांनी खास मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या मी पुन्हा येणार या घोषणेचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. तसेच महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवरही पवारांनी मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रात जे घडलं तो अपघात नव्हता. लोकसभेच्या निवडणुकीत देशातील चित्र पाहून महाराष्ट्रानेही मतदान केलं. पण राज्याचा प्रश्न आला, तेव्हा वेगळा विचार केला, असंही पवार म्हणाले आहेत. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड चित्र बदललं होतं. महाराष्ट्रातही चित्र बदलायचा मूड लोकांचा होता. गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.   

मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं.  कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 105 ही फिगर झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं होतं. शिवसेना नसती तर १०५ चा आकडा 40-50 आसपास असता. 105 पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच गृहित धरलं, असंही शरद पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Why did BJP lose power ?; Sharad Pawar told the story of devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.