CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 08:53 AM2020-07-11T08:53:31+5:302020-07-11T08:54:30+5:30

आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं. 

coronavirus: who praises efforts to contain covid 19 in dharavi | CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्लीः जागतिक आरोग्य संघटने(WHO)ने मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना रोखण्याच्या पॅटर्नचे कौतुक केले आहे. धारावीतील कोरोना विषाणूला रोखण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे आज तो परिसर कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. केवळ या राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.  WHOचे महासंचालक म्हणाले की, 'जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत की कोरोनाचा उद्रेक कितीही मोठा असला तरी तो नियंत्रणात आणला गेलेला आहे. यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि धारावीमध्येही आढळतात.

संयुक्त राष्ट्रांचे आरोग्य प्रमुख म्हणाले की, मुंबईतील या झोपडपट्टी परिसरातील लोकांची चाचणी, ट्रेसिंग, सामाजिक अंतर आणि संक्रमित रुग्णांवर त्वरित उपचार करण्याच्या पद्धतीमुळे धारावी कोरोनावर विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. डब्ल्यूएचओ महासंचालकांनी धारावी मॉडेलचं कौतुक करताना नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता यावर जोर दिला. ते म्हणाले, "ज्या देशांमध्ये वेगवान विकास आहे, तेथील निर्बंध कमी होत आहेत आणि आता प्रकरणे वाढू लागली आहेत. आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं. 

शुक्रवारी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत फक्त १२ नवे रुग्ण सापडले आहेत.  कोरोनाच्या नवीन रुग्णांची एकूण संख्या काल 2,359नं वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या अधिका-याने ही माहिती दिली. नागरी संस्थेने गेल्या काही दिवसांपासून कोरोनामधील मृत्यूची नोंद करणे बंद केले आहे. या अधिका-याने सांगितले की सध्या धारावी येथे  166 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1,952 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून, अडीच चौरस किलोमीटर क्षेत्रात ती पसरली आहे, जेथे जवळपास 6.5 लाख लोक राहतात.

धारावी मॉडेल काय आहे, ज्याद्वारे कोरोना बर्‍याच प्रमाणात नियंत्रित केले गेले होते?
1 एप्रिल रोजी धारावी येथे कोरोनाचे पहिले प्रकरण समोर येण्यापूर्वीच सरकारला भीती वाटली की इथली परिस्थिती आणखी बिघडू शकते. कारण 80 टक्के लोक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. त्या भागात 8 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या एका-एका लहान घरात 10 ते 15 लोक राहतात. म्हणूनच गृह अलगीकरण केले जाऊ शकत नव्हते किंवा लोक सामाजिक अंतराचे अनुसरण करू शकत नव्हते.
म्हणूनच जेव्हा गोष्टी समोर येऊ लागल्या तेव्हा आम्ही चेस व्हायरसच्या खाली काम करण्यास सुरुवात केली. या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, ताप शिबिरे, लोकांना अलग ठेवणे आणि चाचणी सुरू केली. शाळा, महाविद्यालय हे क्वारंटाइन केंद्र बनले. तेथे चांगले डॉक्टर, परिचारिका आणि 3 वेळा चांगले अन्न मिळत होते. रमजानदरम्यान मुस्लिम लोक घाबरले, परंतु क्वारंटाइन केंद्रामधील चांगल्या सुविधा पाहून ते स्वतःहून बाहेर आले. यामुळे सरकारचे काम सोपे झाले. संस्थात्मक 11 हजार लोकांना अलग ठेवणे. साई हॉस्पिटल, फॅमिली केअर आणि प्रभात नर्सिंग होम यांची खूप मदत झाली. या सर्व प्रयत्नांचा परिणाम असा आहे की येथे केवळ 23 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. 77 टक्के लोक बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत.

धारावीमध्ये सार्वजनिक शौचालय हे एक मोठे आव्हान आहे. या समस्येचा सामना कसा केला गेला?
आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे सार्वजनिक शौचालये, ज्यांची संख्या 450पेक्षा जास्त आहे. सुरुवातीला सार्वजनिक शौचालयाची दिवसाला दोन ते तीन वेळा स्वच्छता केली जायची. कोरोनाची प्रकरणं वेगाने वाढू लागल्यानंतर स्वच्छतागृह दिवसातून 5 ते 6 वेळा स्वच्छ करणेनं पालिकेनं सुरू केलं. टॉयलेटच्या बाहेर हँडवॉश ठेवण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची चोरी झाली. पण नंतर याची व्यवस्था केली गेली. डेटॉल आणि हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने येथे मोठ्या प्रमाणात हँडवॉश दिले. स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांनी खूप मदत केली.

Web Title: coronavirus: who praises efforts to contain covid 19 in dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.