शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाने केले संपूर्ण गाव व्यसनमुक्त!

By admin | Updated: June 13, 2015 01:56 IST

व्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा

प्रताप नलावडे, बीडव्यसनापायी संपूर्ण गावाचीच राखरांगोळी होताना पाहून खिन्न झालेल्या वृद्धाने पुढाकार घेऊन गावातील तरूणांच्या सहकार्याने संपूर्ण गावच व्यसनमुक्त करून वेगळा आदर्श घालून दिला आहे. व्यसनमुक्तीसाठी गावातील प्रत्येकाला शपथ देतानाच कोणी व्यसन केले तर त्याला मोठा दंड आकारण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला. १२ दिवसांपासून या गावात दारू, विडी, सिगारेट, तंबाखू आणि गुटखा विक्री बंद करण्यात आली आहे. बीड जिल्'ातील शिरूर कासार तालुक्यातील बरगवाडी हे अडीच हजार लोकसंख्येचे डोंगरकुशीतील गाव. गावातील ९० टक्के लोक ऊस तोडणी कामगार आणि मोलमजुरी करणारे. गावातील ७० ते ८० टक्के लोक दारू , तंबाखू, आणि गुटख्याच्या आहारी गेलेली. गावात सतत भांडणे, मारामारी आणि कटकटी. व्यसनाने इतका विळखा घातलेला की सकाळपासूनच अनेकजण दारूच्या नशेत झिंगलेले असायचे. गावात एखादे लग्न दुपारी १२ च्या मुहुर्तावर असले तर ते लग्न सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान लागायचे. व्यसनामुळे गावाची होणारी दुर्दशा पाहून सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गुरसाळे यांनी पुढाकार घेतला आणि गावातील संभाजी जाधवल दीपक मुळीक, अशोक मुळीक, संतोष बर्ग, सोनाजी तुपे आणि उपसरपंच अंकुश यादव यांच्याशी गावालाच व्यसनमुक्त करण्यासंदर्भात चर्चा सुरू केली. यासाठी संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर एक व्याख्यान ठेवण्यात आले. सगळा गाव यासाठी जमा झाला होता. महिलांचीही उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी महिलांनी गुरसाळे यांना गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा आग्रह धरला. गावात बैठका सुरू झाल्या. सुरूवातीला फारसे लोक येत नसत. परंतु हळूहळू लोक जमू लागले आणि ३१ मे चा मुहुर्त गाठून संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेण्याचा निर्णय झाला. गुरसाळे यांनी प्रत्येकाला व्यसनमुक्तीची शपथ दिली. अगदी मुलाच्या वयाच्या तरूणाचेही गुरसाळे पाय धरताना पाहून अनेकजण खजिल झाले. याचवेळी गावात दारू विक्री करणाऱ्या चौघांनी गुरसाळे यांचे पाय धरले आणि यापुढे गावात आम्ही दारू, गुटखा, तंबाखू असे काहीच विकणार नाही. तसे आढळून आले तर आम्हाला दंड करा, असा प्रस्ताव ठेवला. गावात अशी विक्री करणाऱ्यासाठी पन्नास हजार रूपये दंड तर व्यसन करणाऱ्याला पाच हजार रूपये दंडाची रक्कम गावकऱ्यांनी निश्चित केली. या सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीही तयार करण्यात आली.