महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:48 IST2025-09-10T18:46:54+5:302025-09-10T18:48:03+5:30

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार आहे. पुढील चार वर्षे तरी या सरकारला धोका दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांवर सध्यातरी मोठी जबाबदारी येणार नाही.

Who is the new Governor of Maharashtra? CP Radhakrishnan will resign; likely to take oath as Vice President on September 12 | महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने मध्यावधी निवडणूक लागली होती. यावेळी एनडीएने राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत राधाकृष्णन यांचा मोठा विजय झाला आहे. यामुळे ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार आहे. पुढील चार वर्षे तरी या सरकारला धोका दिसत नाही. यामुळे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांवर सध्यातरी मोठी जबाबदारी येणार नाही. यामुळे या स्थिर वातावरणात कोण राज्यपाल होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परराज्यातूनच भाजप, आरएसएसचा एखादा नेता महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून येण्याची शक्यता जास्त आहे. 

राधाकृष्णन हे येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा १२ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. आज या तारखेवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे यापूर्वीच त्यांना राज्यपाल पद सोडावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा तात्पुरती इतर राज्यांच्या राज्यपालांकडे दिली जाण्याची शक्यता आहे. 

इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार होते. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली.

Web Title: Who is the new Governor of Maharashtra? CP Radhakrishnan will resign; likely to take oath as Vice President on September 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.