शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात कोण?

By admin | Updated: November 3, 2014 03:52 IST

मुळे सोमवार हा नवीन मंत्रिमंडळाचा पहिला कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी मंत्री मंत्रालयात बसून कामकाज करु शकतील किंवा कसे याबाबत स्पष्टता नाही

मुंबई : भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही हे जरी उघड असले तरी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांचे अन्य मंत्र्यांपेक्षा प्रशस्त असलेले दालन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवले जाणार की अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मिळवणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.मंत्र्यांच्या दालनाचे अजून वाटप झालेले नाही व खुद्द मुख्यमंत्री हे दोन दिवस नागपूरमध्ये असतील. त्यामुळे सोमवार हा नवीन मंत्रिमंडळाचा पहिला कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी मंत्री मंत्रालयात बसून कामकाज करु शकतील किंवा कसे याबाबत स्पष्टता नाही. मंत्रालयाचे नुतनीकरण केल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दालने ही अन्य मंत्र्यांपेक्षा ४०० चौ.फू.ने अधिक मोठी आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसला तरी हे दालन ज्येष्ठतेच्या निकषानुसार एकनाथ खडसे यांच्या ताब्यात राहणार की माजी उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचे मंत्री होते त्यामुळे विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाणार याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. खडसे व मुनगंटीवार या दोघांनाही महसूल खाते हवे होते. अखेरीस खडसे यांच्याकडे महसूल खाते गेले. गृह खात्याने हुलकावणी दिलेले शिक्षण खात्याचे मंत्री विनोद तावडे यांचा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पहिल्या मजल्यावरील दालनावर डोळा असल्याचे कळते. मंत्र्यांच्या दालनाबरोबरच बंगल्यांचे वाटप हाही कळीचा मुद्दा ठरणार आहे. रामटेक या बंगल्यात मागील युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य होते. त्यामुळे हा बंगला मिळावा ही पंकजा मुंडे यांची अपेक्षा असल्याचे बोलले जाते. याचबरोबर काही सजवलेल्या बंगल्यांवर काही मंत्र्यांचा विशेष डोळा आहे. मात्र मागील सरकारमधील काही मंत्र्यांनी बंगले सोडलेले नाहीत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना हवे असलेले बंगले लागलीच उपलब्ध होतील किंवा कसे याबाबत शंका आहेत. मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)