शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कुठे हसू आणि कुठे आसू

By admin | Updated: June 1, 2015 04:56 IST

मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे आपणा सर्वांनाच वाटते. नेमकी हीच संधी म्हाडाने इच्छुकांना दिली; आणि इच्छुक पात्र अर्जदारांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लॉटरीच्या

मुंबई : मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे आपणा सर्वांनाच वाटते. नेमकी हीच संधी म्हाडाने इच्छुकांना दिली; आणि इच्छुक पात्र अर्जदारांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न लॉटरीच्या निमित्ताने का होईना साकार झाले. आपल्याला हक्काचे घर मुंबईत लागल्याचे पाहून उपस्थित विजेत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले; तर ही संधी हुकल्यानंतर नाराज उपस्थितांचे डोळे पाणावले.म्हाडाच्या घराच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी दाखल झालेल्या पात्र अर्जदारांच्या डोळ्यांदेखत आणि प्रेक्षकांमधील पंचांसह म्हाडा अधिकाऱ्यांच्या साक्षीने लॉटरीची प्रक्रिया पार पडली. प्रथमत: सायन, मुलुंड आणि गोरेगाव येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. दरम्यान, लॉटरीत आपल्याला घर लागल्याचे पाहून अजयकुमार देडे, भास्कर सपकाळे, प्रभुराज भिलावेकर, प्रशांत मोरे, शशिकांत सावंत आणि विजय वागरे या विजेत्यांचे डोळे आनंदाने भरून आले. या विजेत्यांनी आपल्या मनोगतात आनंद व्यक्त करीत ज्यांना घर लागले नाही; अशांना पुढल्या वर्षीच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासह घराची आशा कायम ठेवण्याचे आवाहन केले. ३१ मे रोजी जाहीर झालेल्या म्हाडा सोडतीचा निकाल https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/mhadaApplication.do  या संकेतस्थळावर पाहता येईल.