'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 22:34 IST2025-05-23T22:31:52+5:302025-05-23T22:34:49+5:30

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते दिसत आहेत. हे सगळे नेते मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तो फोटो बघितल्यानंतर राज ठाकरेंच्या मनात कोणता विचार आला?

'When I saw the photo, the first question I had was, BJP...', Raj Thackeray spoke for the first time on 'that' photo | 'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

Raj Thaceray News: एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या दोन्ही बाजूंनी जे नेते बसलेले होते, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे. यातील बहुतांश नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा फोटो जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बघितला, तेव्हा त्यांना कोणता प्रश्न पडला, याबद्दल त्यांनीच भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात मुलाखत झाली. मुंबईतकला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी या फोटोबद्दल भाष्य केले.

वाचा >>'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान  
 
निवडणुकीच्या वातावरणाबद्दल राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल राज ठाकरे उत्तर देत होते. त्याचवेळी त्यांना निवडणूक आली की स्नेहभोजने होतात, असाही प्रश्न विचारला गेला. 

राज ठाकरे म्हणाले, 'मतभेद असतात, वैर नसतं'

राज ठाकरे म्हणले, "माझ्या घरी जेवायला आले होते ते... कोर्टाने सांगायच्या आधी जेवून गेले. मला असं वाटतं की, राजकारणात तुमचे मतभेद असतात. वैर कधीही नसतं. हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो, हा एक काळ होता. तुमचा कशाला आहे, तर भूमिकांना. भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे. कारण तुम्ही वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असतात. त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता."

"हल्ली काय झालं की वैयक्तिक गोष्टींवर फार यायला लागले आहेत. त्याची काही आवश्यकता नाही. त्याची काही गरज नाही. मतभेद असावेत पण वैर नसावे हे जे मी म्हटलं, तरी असावी. ज्या पद्धतीने भुजबळआत शिरले", असे राज ठाकरे म्हणताच उपस्थितांना हसू अनावर झाले. 

फडणवीसांच्या आजूबाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते; राज ठाकरे म्हणाले...

एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "परवा दिवशी मी एक फोटो बघितला. विलक्षण फोटो होता. देवेंद्र फडणवीस मध्ये बसले आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला अजित पवार, सुनिल तटकरे आहेत. दुसऱ्या अशोक चव्हाण, भुजबळ आणि काही जण."

"ज्यावेळी मी फोटो पाहत होतो, तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की, भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील? ह्यांची लावलीये आपण आणि सत्तेवर आलो. आणि हे आता आमची लावायला आले. म्हणजे काय चाललंय, त्यांचं त्यांनाच कळत नसेल", असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी लगावला. 

Web Title: 'When I saw the photo, the first question I had was, BJP...', Raj Thackeray spoke for the first time on 'that' photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.