शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 20:59 IST

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे...

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांनी संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच, एका परदेशी व्यक्तीचा संदर्भात देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इव्हीएम मशिनसंदर्भात गंभीर आरोप केला होता. "एका परदेशी व्यक्तीने फोन करून मशिनमध्ये (इव्हीएम मशिन) गडबड असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की काही मशिनमध्ये गडबड होऊ शकते. पण मला निवडणूक आयोगावर विश्वास आहे," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. यावर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी, "जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो," असे प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

सुप्रियासुळे यांच्या आरोपावर बोलताना दरेकर म्हणाले, "मला वाटते ज्या वेळेला पराभव समोर दिसतो, त्या वेळेला अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो. एक गोष्ट, जसा पाऊस येणार असेल की 'डराव-डराव' बेडूक करतात, म्हणजे आपल्याला पावसाची चाहूल त्या ठिकाणी लागते. तसेच पराभव हा निश्चित झालाय, हे सुप्रिया ताईंना कळून चुकलंय आणि म्हणून आत्तापासूनच पराभवाची कारणमिमांसा करण्याचे त्यांचे सत्र सुरू झाले आहे. निवडणुकीपर्यंत आणखी अशा प्रकारे खोट्या गोष्टी पसरवून, आम्ही पराभूत का झालो? याचे विश्लेषण ते करत बसतील."

काय म्हणाल्या होत्या सुळे? -सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, "एका माणसाचा फोन येतो मला. तो कुणीतरी परदेशी आहे. तो सारखं फोन करून म्हणतो की, 'ताई, मशिनमध्ये गडबड आहे, मशिनमध्ये गडबड आहे.' मी त्याला म्हणते, 'मी मशिनमुळेच निवडून आले. मी कसं म्हणणार मशिनमध्ये गडबड आहे?'" 

असं तो माणूस म्हणतोय, मी म्हणत नाही... -सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, "आता खरं खोटं मला माहिती नाही, पण अशी एक कथा चालली आहे की, काही मशिन्समध्ये गडबड करतील. असं तो माणूस म्हणतोय. मी म्हणत नाही. हे 170 सीट येतात, असे म्हणत आहेत, कारण त्यांनी काहीतरी नियोजन केलेले आहे." यानंतर, "माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही, कारण माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे," असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेpravin darekarप्रवीण दरेकरNCPराष्ट्रवादी काँग्रेस