शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आक्रमक होतात तेव्हा...

By admin | Updated: December 17, 2014 23:35 IST

मुंबईत रखडलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले

योगेश पांडे, नागपूरमुंबईत रखडलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. केंद्रीय कायद्यांमुळे विकासकामांत अडथळे निर्माण होत आहेत. राज्य शासन यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करीत आहे. सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असताना प्रत्येक मुद्यावर राजकारण कसले करता या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्तापक्षातील सदस्यदेखील आश्चर्यचकित झाले.‘एमएमआरडीए’ने तयार केलेल्या नवीन नियमावलीला मान्यता देण्याबाबत अ‍ॅड.अनिल परब यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारणा केली होती. ‘मेट्रो’ आणि मोनो सेवेसाठी लागणाऱ्या बांधकामांना परवानगी देण्याबाबत स्पष्ट तरतूद नसल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची ‘एमएमआरडीए’ने शासनास विनंती केली आहे असे लेखी उत्तर शासनाकडून देण्यात आले होते. ‘एमएमआरडीए’ला विशेष नियोजन प्राधिकरण घोषित करण्याची आवश्यकता नाही असेदेखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांबाबत काय अशी विचारणा विरोधकांनी केली. मुंबईत प्रकल्प मार्गी लागावे यासाठी पंतप्रधानांना समिती बनविण्याची विनंती केली. रखडलेले प्रकल्प लवकर व्हावेत यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. याचे स्वागत करायला हवे. तर उलट विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. यावर मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यामध्ये समन्वय आहे का असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित करताच फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईतील ‘कोस्टल रोड’संदर्भात २०११ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला. परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली. त्यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान दोघेही काँग्रेसचे होते. मग त्यांचा समन्वय नव्हता का? आम्ही प्रयत्न तरी करतो आहे. राजकीय विचारणा कराल तर राजकीय उत्तरच मिळेल. अकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करु नका असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.