शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी केव्हा रद्द होणार?

By admin | Updated: December 17, 2014 00:34 IST

सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर प्रारंभी यू टर्न घेतला होता. जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही,

नागपूर : सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर प्रारंभी यू टर्न घेतला होता. जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही, असेही म्हटले होते. पण सोमवारी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी हटविण्याची घोषणा केल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एका महिन्यात एलबीटी रद्द करण्याच्या ना. नितीन गडकरी यांच्या घोषणेला आता सहा दिवस उरले आहेत. चार ते पाच दिवसात एलबीटी रद्द होईल, अशी अपेक्षा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आहे. लवकरच घोषणा अपेक्षितभाजपाने निवडणुकीच्या घोषणापत्रात नमूद केल्यानुसार भाजपने सत्तेवर येताच एलबीटी रद्द करायला हवा होता. उशीर झाला असला तरीही येत्या चार ते पाच दिवसात विधिमंडळात घोषणा होण्याची अपेक्षा आहे. व्यापारी कर भरण्यास तयार आहे. पण त्यांना किचकट प्रक्रिया नको. अधिवेशनाआधी मनपाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाकलेल्या धाडीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी रद्द झाल्यानंतर येणारा पर्यायी कर सरळसोपा असावा. मयूर पंचमतिया, अध्यक्ष नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सकारवाई थांबवाएलबीटीच्या नावाखाली अनावश्यक कारवाई करून व्यापाऱ्यांना जेरीस आणले आहे. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. आता एकमुश्त करप्रणाली असावी. घोषणेनुसार मुख्यमंत्री एलबीटी रद्द करण्यासाठी तातडीने निर्णय घेतील, असा विश्वास आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर राजपासून मुक्तता मिळेल. अधिवेशनात एलबीटी रद्द होण्याची अपेक्षा आहे. सचिन पुनियानी, सहसचिव,नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स.