शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुस्लिमांचे काय होणार?

By admin | Updated: October 11, 2014 05:51 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राज्यात भाजपाने पाळेमुळे रोवली. मात्र; संधी मिळताच सत्तेसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली.

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राज्यात भाजपाने पाळेमुळे रोवली. मात्र; संधी मिळताच सत्तेसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली. त्यामुळे जे बाळासाहेबांचेच झाले नाहीत, ते भाजपावाले मुस्लिमांचे कदापि होणार नाहीत, अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथील काँग्रेस नेते इमरान मसूद यांनी केली.अ‍ॅकॅडमिक स्कूलच्या प्रांगणात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मसूद बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान मोदी हे मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. मुजफ्फरनगर येथे जातीय दंगली घडविण्यात अमित शहा यांचाच हात होता. त्यावेळी मुस्लिमांना ईद साजरी करु देणार नाही, असा फतवा अमित शहा यांनीच काढला होता. मात्र, उत्तर प्रदेशातील काही हिंदू बांधवांच्या मदतीने मुस्लिमांनी ईद साजरी करुन शहांना उत्तर दिल्याचे ते म्हणाले.भाजपावाले आता मदरशात आतंकवादी प्रशिक्षण देत असल्याचा आरोप करीत आहेत. परंतु मोदींनी देशभरातील कोणत्याही मदरशाची तपासणी करावी, तसे काही आढळल्यास मुस्लिम जबाबदार राहतील, असे ते म्हणाले.मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या संघ परिवारातील एकाने तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले काय? असा सवाल करीत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिमच आघाडीवर होते. संघ परिवार केवळ ब्रिटिशांशी हातमिळवणी करण्यात मश्गुल होता, असा आरोप करून ते म्हणाले, भाजपाकडे महापुरुष नाहीत, त्यामुळे ते काँग्रेसकडे असलेले महापुरुष उसने घेत असून नरेंद्र मोदी हे महापुरुषांच्या नावे विविध योजना सुरु करीत आहेत.भाजपा आणि संघ परिवार मुस्लिमांना संपविण्याचे कटकारस्थान रचत आहेत. मुस्लिम समाज धर्मांधशक्तींना कधीही खतपाणी घालणार नाही, हे सांगताना येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)