आम्ही काय झक मारायला आलो का - आमदार प्रशांत बंब भडकले

By Admin | Updated: July 16, 2015 14:30 IST2015-07-16T14:12:20+5:302015-07-16T14:30:36+5:30

विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले असून त्यांनी सभागृहात आम्ही इथे काय झक मारायला आलो आहोत का

What did we come to shamble - MLA Prashant Bamb Bhadale? | आम्ही काय झक मारायला आलो का - आमदार प्रशांत बंब भडकले

आम्ही काय झक मारायला आलो का - आमदार प्रशांत बंब भडकले

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - शेतक-यांना संपू्रण कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी मागणी करत चार दिवस विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांवर भाजपाचे आमदार प्रशांत बंब चांगलेच भडकले असून त्यांनी सभागृहात आम्ही इथे काय झक मारायला आलो आहोत का असा प्रश्न विचारत आपल्या संतापाला वाट करून दिली. अधिवेशनावर बहिष्कार टाकणा-या विरोधकांचे भत्ते कापावेत अशी मागणी त्यांनी अध्यक्षांकडे केली तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी असेही बंब म्हणाले.
विरोधक सभागृहात आले तर चर्चा होईल ना, त्यासाठी त्यांनी आधी इथे यायला हवं असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर नक्की बोलतील असे बंब यांनी सांगितले.
अर्थात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसने विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असला तरी राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आले, त्यामुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे.

Web Title: What did we come to shamble - MLA Prashant Bamb Bhadale?