शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

राज्यात एक आठवडा 'वरुणराजा' विश्रांती घेण्याची शक्यता; कोकणात काही ठिकाणीच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 19:55 IST

१९ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

ठळक मुद्दे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : राज्यात सध्या कोकण पट्ट्यातच पाऊस असून आवश्यक ढगनिर्मिती होत नसल्याने राज्यात पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती दिसून येत नाही. येत्या आठवड्यात राज्यात पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र, कर्नाटक -लक्षद्वीप किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले काही दिवस कोकणात पाऊस होत होता़ हे कमी दाबाचे क्षेत्र आता कर्नाटक केरळ किनारपट्टीलगत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. याबाबत पुणेहवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला असून सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सध्या मॉन्सून कोकणात सक्रीय आहे. ढगनिर्मितीची प्रक्रिया होत नसल्याने पुढील एक आठवड्यात राज्यात मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २४ जुलैपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात कोकणातील मालवण १५०, रत्नागिरी १४०, मुलदे १३०, काणकोण, कुडाळ १२०, पणजी ११०, कपे, सावंतवाडी १००, दोडामार्ग, मडगाव, पेडणे, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई, वेंगुर्ला ९०, दाभोलीम, म्हापसा, सांगे ८०, कणकवली, लांजा, मार्मगोवा ७०, राजापूर ६० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्रातील राधानगरी ७०, गगनबावडा, महाबळेश्वर ५०, आजरा, चांदगड, लोणावळा, शाहूवाडी, वेल्हे ३०मिमी पाऊस झाला होता़ मराठवाड्यातील गंगापूर, फुलंब्री येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ तर विदर्भातील धारणी येथे ५०मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी ७०, शिरगाव, अम्बोणे, दावडी, डुंगरवाडी,कोयना, खोपोली ४० मिमी पाऊस झाला होता. १९ जुलै रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरीagricultureशेती