राज्याला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:48 AM2021-09-19T07:48:19+5:302021-09-19T07:49:13+5:30

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे बदललेले हवामान याचा एकत्रित परिणाम विदर्भ, मराठवाडा,  मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर राहील, त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Warning of torrential rains for the next four days in Maharashtra | राज्याला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्याला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Next

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. (Warning of torrential rains for the next four days in Maharashtra)

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे बदललेले हवामान याचा एकत्रित परिणाम विदर्भ, मराठवाडा,  मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर राहील, त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. असे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 

Web Title: Warning of torrential rains for the next four days in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app