शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचोरांनो, आता सावधान

By admin | Updated: December 27, 2014 04:17 IST

महसूल व पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरणाऱ्या अवैध वाळू उपशावर आता ‘एसएमएस’चा उतारा शोधण्यात आला आहे. राज्य सरकारने सध्याच्या स्मार्ट

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर (जि. अहमदनगर) -महसूल व पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरणाऱ्या अवैध वाळू उपशावर आता ‘एसएमएस’चा उतारा शोधण्यात आला आहे. राज्य सरकारने सध्याच्या स्मार्ट जमान्यात ‘स्मॅटस्’ (सँड मायनिंग अ‍ॅप्रोव्हल अँड ट्रॅकिंग सिस्टीम) नावाची नवी प्रणाली विकसित केली आहे. मोबाइल आधारित या प्रणालीच्या अंमलबजावणीचा आदेश शुक्रवारी (२६ डिसेंबर) महसूल विभागाने काढला आहे.वाळूचा बेकायदा उपसा व वाहतूक रोखणे महसूल प्रशासनास डोकेदुखी ठरते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांच्या जिवावरही बेतले आहे. पोलीस पाटलांपासून ते प्रांताधिकाऱ्यांवर वाळू तस्करांनी ट्रक घातल्याचे प्रकार घडले आहेत.महाआॅनलाइनने विकसित केलेल्या प्रणालीमुळे लिलावधारकव संबंधित महसूल अधिकाऱ्यांना वाळू गटातून संबंधित कंत्राटदार करत असलेले उत्खनन, वाळूचे वजन, वाहन क्रमांक, वाळू गटाचे नाव, क्रमांक, वाहन कोठून कोठे जाणार आहे, त्या दोन ठिकाणांमधील अंतर आदी तपशील मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविले जातील. त्यामुळे अधिकाऱ्यांना वाळू ट्रक तपासल्यानंतर त्याची शहानिशा करता येईल.वाळू लिलावधारकांबरोबर करावयाच्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे निश्चितीकरण तसेच अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध होण्यासाठी या प्रक्रियेत पारदर्शकता येऊन राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी लागू होणारी ही प्रणाली हातभार लावेल, अशी सरकारची अपेक्षा आहे.