शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

भन्नाट! एका दिवसासाठी जेलमध्ये जायचंय?; माफक शुल्क घेणार, करावा लागेल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 07:11 IST

प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ‘जेल टुरिझम’; पहिला उपक्रम येरवडा कारागृहातून 

नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘जेल टुरिझम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, २६ जानेवारीला येरवडा (पुणे) कारागृहातून त्याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कारागृह पर्यटनाचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

येरवडा, ठाणे, नाशिक, नागपूर येथील कारागृहे स्वातंत्र्य लढ्यादरम्यानच्या अनेक घटना, प्रसंगाचे साक्षीदार आहेत. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंसह अनेक थोर मंडळी या कारागृहात बंदिस्त होती. ते ज्या ठिकाणी राहिले, त्या कोठडीही जतन करण्यात आले आहे. म. गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार येरवडा कारागृहातील ज्या आंब्याच्या झाडाखाली झाला होता, त्या झाडाचेही जतन करण्यात आले आहे. 

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब, जनरल वैद्य यांचे मारेकरी जिंदा आणि सुखा तसेच चाफेकर बंधूंना येरवड्यातच फासावर टांगण्यात आले होते. अशा अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या येरवडा कारागृहाची सर्वांना, खासकरून विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना माहिती मिळावी, या उद्देशाने जेल टुरिझमचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येरवडानंतर राज्यातील अन्य कारागृहातही कारागृह पर्यटन सुरू केले जाणार असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

माफक शुल्क घेणार, करावा लागेल अर्जपर्यटक म्हणून ज्यांना कारागृह बघायचे आहे, त्या व्यक्ती वा संस्थांना आधी अर्ज करावा लागेल. कारागृहात जाताना खाद्यपदार्थ, बॅग, मोबाईल, कॅमेरा, पाण्याची बाटली अथवा कुठलीच वस्तू आत नेता येणार नाही. प्रशासनाकडून फोटो आणि व्हिडिओग्राफीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ते नंतर संबंधितांना उपलब्ध करून दिले जातील. प्रवेश शुल्क शालेय विद्यार्थ्यांसाठी ५, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १०, तर अन्य पर्यटकांना ५० रुपये शुल्क असेल.

 

टॅग्स :jailतुरुंगAnil Deshmukhअनिल देशमुखtourismपर्यटन