शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित १९ पूल मार्गी लागण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 24, 2014 01:08 IST

अकोला जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे.

अकोला : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे. या पृष्ठभूमीवर प्रस्तावित १९ पुलांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची पार वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून चालताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, वाहतुकीलाही कमालीचा अडथळा निर्माण होत आहे. रस्ते समस्यांसोबतच जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांची संख्या तोकडी आहे. तसेच काही पुलांची दुरवस्था झाली आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थितीच्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे प्रसंग घडत असतात. तसेच या समस्येचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुलांची वानवा जाणवत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन पुलांची कामे मार्गी लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.** ३२ मोठे; २४२ लहान पूल!सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सध्या ३२ मोठे आणि २४२ लहान पूल आहेत. त्यामध्ये राज्य मार्गावर २८ मोठे आणि १४६ लहान पूल आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ४ आणि लहान ९५ पूल आहेत. याशिवाय राज्य मार्गावर ८५९ रपटे असून, जिल्हा मार्गांवर ८४२ रपटे आहेत.

** गांधीग्राम व डाबकी  पुलाचा प्रश्न मार्गी ! अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्राम पुलाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात पूर्णेला पूर आल्यास या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागतात. त्यामुळे येथे नवीन पूल बांधण्याची गेल्या अनेक वर्षांची या भागातील नागरिकांची मागणी होती. अखेर गांधीग्रामच्या पुलासह पोचमार्गाच्या कामाला शासनामार्फत गेल्या ऑगस्टमध्ये मंजुरी प्राप्त झाली. पूल आणि रस्त्याच्या कामांसाठी २५ कोटी ६३ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला. निविदा प्रक्रियेनंतर लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अकोला शहरानजीकच्या डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या उड्डाण पुलाचे कामदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.