शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

विक्रांतने ६0 कोटींना डुबवले

By admin | Updated: June 12, 2015 04:11 IST

भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी करणारी विक्रांत युद्धनौका नुकतीच भंगारात काढण्यात आली. मात्र ही युद्धनौका भंगारात काढणाऱ्या आयबी

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी करणारी विक्रांत युद्धनौका नुकतीच भंगारात काढण्यात आली. मात्र ही युद्धनौका भंगारात काढणाऱ्या आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडला त्याचे भाग विकल्यानंतरही तब्बल ६0 कोटी ५७ लाख रुपये नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. भारत-पाकिस्तान युद्धात गौरवशाली कामगिरी केल्यावर ३१ जानेवारी १९९७ साली विक्रांत युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. त्यानंतर नौदलानेही त्यावर संग्रहालय साकारून पर्यटकांसाठी ते खुले केले. मात्र देखभाल आणि दुरुस्तीच्या मागे येणारा कोट्यवधींचा खर्च पाहता ती भंगारात विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने विक्रांतला ६३ कोटी २ लाख रुपयांना विकत घेतले. भंगारात निघणाऱ्या विक्रांतला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने विक्रांतला भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु विक्रांत बचाव समितीकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आणि न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर स्थगितीही दिली. अखेर न्यायालयाने विक्रांतबाबतची याचिका निकाली काढत स्थगिती उठवली. २0१४च्या डिसेंबरपासून विक्रांत मोडीत काढण्याचे काम सुरू करून ते मार्चपर्यंत पूर्ण करण्यात आले आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विक्रांतच्या सर्व भागांची बाजारभावाने विक्री करण्यात आली. त्यातून मिळालेले उत्पन्न आणि प्रक्रियेसाठी आलेला खर्च पाहता आयबी प्रायव्हेट लिमिटेडला तब्बल ६0 कोटी ५७ लाखांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. विक्रांत ही आयबीने ६३ कोटी २ लाखांना विकत घेतली आणि त्यानंतर वॅट, आयकर, आॅक्ट्रोय, कस्टम ड्युटी, टोर्इंग यासह ती मोडीत काढताना आलेला खर्च यामुळे आयबीला तब्बल २७ कोटी ५५ लाखांचा खर्चाचा भार सोसावा लागला. विक्रांतच्या सुट्ट्या भागांना बाजारभाव चांगला मिळेल, अशी आशा आयबीला होती. मात्र एकूण ३0 कोटी रुपयांना त्याचे सर्व भाग बाजारात विकले गेले, असे आयबी कंपनीचे संचालक अब्दुल करीम जाका यांनी सांगितले.