शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप

By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2025 00:06 IST

Manoj Jarange-Patil News: ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना केलेल्या मारहाणीमागे राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा लातुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला.

- राजकुमार जाेंधळे

लातूर - ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना केलेल्या मारहाणीमागे राष्ट्रवादीचे नेते खा. सुनील तटकरे आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा लातुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला.

ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर पत्रपरिषदेत जरांगे-पाटील म्हणाले, ज्यावेळी अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले झाले, तेव्हा त्यांना चीड आली नाही. परंतु, लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रपरिषदेत पत्ते टाकल्यानंतर इतका राग का यावा. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढायचे नाही का, असा सवाल करीत अजितदादांनी आता लक्ष घालावे, अन्यथा जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ॲड. घाडगे-पाटील यांना केलेली मारहाण जाणीवपूर्वक आहे. ते गंभीर जखमी आहेत. मारहाण करणाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. नव्याने जबाब घेऊन पुरवणी एफआयआर करा, घाडगे यांना एका डोळ्याने कमी दिसत आहे.

उग्र आंदोलने नको; लोकशाही मार्गानेच जाऊ...मनोज जरांगे-पाटील म्हणाले, लोकशाही मार्गानेच उत्तर दिले जाईल. कार्यकर्त्यांनी संयम पाळावे, उग्र आंदोलने नको. तत्पूर्वी ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील म्हणाले, मला झालेली मारहाण पूर्वनियोजितच आहे. एकट्या सूरज चव्हाणचा विषय नाही, त्यामागे कट आहे. इतर अनेकजण होते. त्यांच्या हातात कडे आणि फायटर होते. ज्यामुळे मला जबर मार लागला. मी जखमी झालो आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaturलातूर