विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:40 IST2026-05-19T06:39:48+5:302026-05-19T06:40:10+5:30

स्था. स्वराज्य संस्थांमधील राजकारण तापणार

vidhan parishad election : Battle for 17 seats of Legislative Council; Elections to be held on June 18 | विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार

विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठीची निवडणूक १८ जूनला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळेल व महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी बराच संघर्ष करावा लागेल, असे चित्र संख्याबळ बघता दिसते.

यापैकी १६ जागांसाठीची निवडणूक तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला होता. बावनकुळे यांच्या या जागेचा कार्यकाळ १ जानेवारी २०२८ पर्यंत आहे. याचा अर्थ या जागेवर निवडून येणाऱ्या व्यक्तीला दीड वर्षांसाठीच आमदारकी मिळेल. अन्य १६ जणांना ६ वर्षांचा कार्यकाळ मिळेल. अलीकडे स्थानिक संस्था निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले हाेते.

निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जारी :     २५ मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :     १ जून
अर्जांची छाननी :     २ जून 
अर्ज माघारीची शेवटची तारीख :     ४ जून
मतदान :     १८ जून - स. ८ ते दु. ४. 
मतमोजणी :     २२ जून  

हे असतात मतदार : महापालिकांचे सर्व नगरसेवक, नगरपालिका, नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य, सर्व स्वीकृत सदस्य, कॅन्टोन्मेंट बोर्डांचे सदस्य.

निवडणुकीला विलंब कशामुळे? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणूक होऊ शकलेली नव्हती.  

संख्याबळ काय होते? 
भाजप     ७ 
शिवसेना     ५
राष्ट्रवादी     ३
काँग्रेस     २

या ठिकाणी निवडणूक  : १) सोलापूर २) अहिल्यानगर ३) ठाणे ४) जळगाव ५) सांगली-सातारा ६) नांदेड ७) यवतमाळ ८) पुणे ९) भंडारा-गोंदिया १०) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ११) नाशिक १२)  वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली १३) अमरावती १४) धाराशिव-लातूर-बीड १५) परभणी-हिंगोली १६) छ. संभाजीनगर-जालना  १७) नागपूर (पोटनिवडणूक)  

आधीचे आमदार कोण?   
सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप), अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी), ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना), जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप), सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस), नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस), यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना), पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी),  भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप), रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी), नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना), वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप), अमरावती : प्रवीण पोटे (भाजप), धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप), परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना), छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना), नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप).

Web Title : विधान परिषद की 17 सीटों के लिए 18 जून को चुनाव

Web Summary : स्थानीय निकायों से विधान परिषद की 17 सीटों के लिए चुनाव 18 जून को होगा। महायुति गठबंधन को फायदा होने की उम्मीद है। नागपुर का उपचुनाव भी इस्तीफे के बाद निर्धारित है। चुनाव कार्यक्रम घोषित कर दिया गया है, मतगणना 22 जून को होगी।

Web Title : Legislative Council Elections for 17 Seats on June 18

Web Summary : The election for 17 Legislative Council seats from local bodies will be held on June 18. The MahaYuti coalition is expected to have an advantage. Nagpur's by-election is also scheduled following a resignation. The election program has been announced, with vote counting on June 22.