VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:37 IST2026-04-13T13:35:49+5:302026-04-13T13:37:21+5:30

Sachin Tendulkar cried at Asha Bhosale Funeral: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने सारेच हळहळले

VIDEO Sachin Tendulkar Cries Inconsolably As Cricket Legend Pays Respects To Late Asha Bhosle In Mumbai | VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर

Sachin Tendulkar cried Asha Bhosale Funeral: भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व, सर्वांच्या लाडक्या आशाताई म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. आशा भोसले यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांचे पार्थिव मुंबईत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याला आशाताईंना शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर झाले.

सचिन झाला भावूक

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकर आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेताना अत्यंत व्याकुळ झालेला दिसत आहे. त्यांच्या निधनाने सचिनला इतका धक्का बसला की त्याला सर्वांसमोर रडू कोसळले. सचिन तेंडुलकर आशा भोसले यांना आपली आजी मानत असे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने आशाताईंनी त्याच्यासाठी बनवलेल्या जेवणाचा आणि त्यांच्यातील गप्पांचा उल्लेख केला आहे. आशाताईंनी सचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळींचे नेहमीच कौतुक केले होते. त्यामुळे आपल्या मातृतुल्य व्यक्तिमत्वाला निरोप देताना सचिन भावनिक झाल्याचे दिसून आले.

---

दरम्यान, आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी क्रिकेट, बॉलीवूड आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मुंबईत दाखल झाले. त्यात सचिनचा हा अत्यंत भावूक अवतार पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. लतादीदींच्या निधनानंतर आता आशाताईंचे जाणे ही संगीतक्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीनेही आपला एक महत्त्वाचा आधारस्तंभ गमावला आहे. सचिनने सोशल मीडियावरही आशाताईंसोबतचा एक जुना फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. "तुमचा आवाज आणि तुमचे प्रेम नेहमीच माझ्या हृदयात जिवंत राहील," अशा शब्दांत त्याने त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title : आशा भोसले के अंतिम संस्कार में सचिन तेंदुलकर हुए भावुक, दी श्रद्धांजलि

Web Summary : मुंबई में आशा भोसले के अंतिम संस्कार में सचिन तेंदुलकर भावुक हो गए। उन्होंने उन्हें परिवार जैसा माना और पुरानी यादें ताजा कीं। कई गणमान्य व्यक्तियों ने भाग लिया, और भारतीय सिनेमा में महत्वपूर्ण योगदान देने वाली एक महान गायिका के नुकसान पर शोक व्यक्त किया। सचिन ने ऑनलाइन श्रद्धांजलि अर्पित की।

Web Title : Sachin Tendulkar Cries at Asha Bhosle's Funeral, Pays Respects

Web Summary : Sachin Tendulkar was overcome with emotion at Asha Bhosle's funeral in Mumbai. He considered her like family, recalling fond memories. Many dignitaries attended, mourning the loss of a legendary singer who significantly contributed to Indian cinema. Sachin shared a heartfelt tribute online.