आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:07 IST2025-07-18T06:07:09+5:302025-07-18T06:07:39+5:30

Jitendra Awhad- Gopichand Padalkar row:

Video: Jitendra Awhad- Gopichand Padalkar row lasted all night! Nitin Deshmukh was detained by the police, Awhad was outside the police station all night... | आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...

आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. याचे पडसाद शुक्रवारी पहाटेपर्यंत उमटत होते. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तर उलट पोलिसांनी आव्हाड यांच्या मार खाल्लेल्या कार्यकर्त्यालाच ताब्यात घेतल्याचा प्रकार घडल्याने आव्हाड यांनी रात्रभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. 

जितेंद्र आव्हाड यांच्यानुसार, पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडले आहे.आणि विधानसभा सचिवांनी  माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

तसेच सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!
मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, अशी पोस्ट आव्हाड यांनी एक्सवर केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनासमोर बसत आंदोलन करत असल्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. 

विधानभवनात काय घडले...
विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकत्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. तर तिथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि इतरांनी मध्ये पडून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना दूर केले.

मारहाणीचा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर काल गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने सामने आले असता दोन्हीकडून एकमेकांना शिविगाळ करून धमकावण्यात आले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या वादाने गंभीर वळण घेतलं आहे. 

Web Title: Video: Jitendra Awhad- Gopichand Padalkar row lasted all night! Nitin Deshmukh was detained by the police, Awhad was outside the police station all night...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.