विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू

By Admin | Updated: June 29, 2014 00:37 IST2014-06-29T00:37:07+5:302014-06-29T00:37:07+5:30

विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला.

Vidarbha will hinder the development | विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू

विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू

उद्धव ठाकरेंचा इशारा : ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान प्रारंभ
गोंदिया : विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला. आता येत्या विधानसभेतही भगवा फडकू द्या. वचन देतो विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र्र अभियानाचा शुभारंभ ठाकरे यांनी गोंदियातून केला. यानिमित्त येथील गुरूनानक शाळेच्या मैदानात आयोजित मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
मंचावर खासदार विनायक राऊत, नेते सुभाष देसाई, खासदार अशोक शिंदे, खासदार कृपाल तुमाने, विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी, आमदार निलम गोऱ्हे, शिवसेना संपर्क नेते डॉ. दीपक सावंत, रमेश बक्शी, विलास चावरी, संपर्क प्रमुख सतीश हरडे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार आशिष जायस्वाल, आमदार संजय राठोड, माजी आमदार रमेश कुथे, जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे, मुकेश शिवहरे उपस्थित होते.
ठाकरे पुढे म्हणाले तुम्ही विश्वास ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. ही सुरूवात फक्त गोंदियासाठी नाही तर विदर्भासाठी केली आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भ भगवा करून द्या. शिवबंधनावर बोलताना त्यांनी, कित्येकांनी अगोदर याची थट्टा केली. मात्र शिवबंधन हा फक्त दोरा नसून ते समाजाचं व महिलांच्या रक्षेच बंधन आहे. समाज व महिलांच्या रक्षणाची जबाबदारी त्यात असून लोकसभेत त्याची थट्टा करणाऱ्यांना या जनतेने जागा दाखवून उत्तर दिल्याचे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या आगमनानिमित्त बिरसी विमानतळ येथून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती. याप्रसंगी जिल्हा शिवसेनेच्यावतीने रमेश कुथे व राजु कुथे यांनी उद्धव ठाकरे यांना स्मृतीचिन्ह व तलवार भेट दिली. पश्चात मंचावरच शिवबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना ठाकरे यांनी बंधन बांधले. या कार्यक्रमात अनेकांनी शिवसेनत प्रवेश केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha will hinder the development